नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता.२५) रोजी ५ प्रतिष्ठानांवर कारवाई करून ४० हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मीनगर झोन आणि मंगळवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकल्यासंदर्भात ३ प्रतिष्ठानांवर कारवाई करून २५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.
उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल गांधीबाग झोन अंतर्गत गणेश किराणा स्टोर्स वर प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करण्यासाठी कारवाई करून रु ५, ००० चा दंड वसूल केला आणि २ किलो प्लास्टिक जब्त केले. तर धंतोली झोन अंतर्गत येणाऱ्या पार्वती नगर येथील बुलेट बार अँड रेस्टोरंट यांच्यावर कचऱ्याचे विलगीकरण नकरणे व अस्वच्छ स्वयंपाकगृह असल्याबाबत कारवाई करून १० हजार रुपयांचा दंड वसुल केले. तसेच लक्ष्मीनगर झोन येथील सतीश एन्क्लेव्ह, कन्नमवार नगर, वर्धा रोड येथे बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवल्यामुळे १० हजार रुपयांचा दंड केला. तसेच मंगळवारी झोन अंतर्गत शंभू नगर कोराडी येथील झील पाव्हर्स अँड टाईल्स यांच्याविरुद्ध बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकल्यामुळे त्यांच्यावर १० हजाराचा दंड केला तसेच विशाल भसीन यांच्यावर बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवल्यामुळे रु ५ हजाराचा दंड वसूल केला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.