245 नळ धारकांवर कपातीची कारवाई

– 107 जलमापक यंत्र ( मीटर ) जप्त

चंद्रपूर :- चंद्रपुर महानगरपालिकेतर्फे जलमापक यंत्र ( मीटर ) काढुन पाण्याचा वापर करणाऱ्या 245 नळ धारकांवर नळ कपातीची कारवाई करण्यात आली असुन 107 जलमापक यंत्र जप्त करण्यात आले आहे.तसेच मीटर काढुन पाण्याचा वापर करणाऱ्या 2407 नळधारकांची नोंद घेण्यात आली असुन त्यांनी मीटर जोडणी न केल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे.

आयुक्त विपीन पालीवाल यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार ७ जानेवारी रोजी शहराती नळ जोडणी योजनेचा आढावा घेण्यात आला. शहरातील सर्व नळ जोडणीवर जलमापक (मीटर) लावण्यात आले असुन जानेवारी महिन्यापासुन याचा प्रत्यक्ष वापर सुरु आहे. मात्र घरपोच पाणी मिळत असूनही अनेक नागरिकांद्वारे पाण्याचे देयक भरण्यात कुचराई करण्यात येत असल्याने मोठया प्रमाणात थकबाकी निर्माण होत आहे.मीटर लावण्यात आलेल्या घरांपैकी केवळ 14 टक्के इतक्याच नळजोडणी धारकांनी देयकाचा भरणा केलेला आहे. यामुळे प्रामाणिकपणे करभरणा करणाऱ्या नागरिकांचे नुकसान होत असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागातर्फे देण्यात आली.

काही नळ ग्राहक हे पाणी वापराचा खर्च टाळण्याच्या दृष्टीने पाईपलाइनवर बसविण्यात आलेले जलमापक यंत्र काढुन पाणी भरत असतात. त्यामुळे अनेकदा नागरिकांचे देयक हे शून्य रुपये येते.सदरची बाब नियमबाहा असल्याने असे प्रकार थांबविण्याच्या दृष्टीने येत्या 15 दिवसांत पाणी पुरवठा कार्यालयात प्रत्यक्ष अथवा भ्रमणध्वनी व्दारे संपर्क करून नळ जोडणी करून घेण्याच्या सूचनाही व्हॉल्वमनमार्फत सदर नळ धारकांना देण्यात आल्या होत्या. परंतु अजुनही काही नळ धारकांनी नळ जोडणी न केल्याने अश्या ग्राहकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येत आहे.

याप्रसंगी आयुक्त यांनी सुचनांचे पालन न करणाऱ्या नळ धारकांची नळ जोडणी कपात करण्याच्या तसेच मोठ्या अपार्टमेंटमधील रहिवाश्यांच्या वैयक्तीक कनेक्शन बंद करून सोसायटीच्या नावे एकच कनेक्शन देण्याची सूचना त्यांनी याप्रसंगी दिल्या. नाळ कपातीसाठी महानगरपालिकेमार्फत 6 पथक तयार करण्यात आले आहे. ज्या नळ ग्राहकांची नळ कपात करण्यात आलेली आहे अश्या ग्राहकांनी पुनश्चः नळ जोडणीकरिता आवश्यक शुल्क आकारणीचा भरणा करावा, यासाठी मनपा पाणी पुरवठा विभाग अथवा पाण्याची टाकी कार्यालय येथे संपर्क करण्याचे मनपाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 69 प्रकरणांची नोंद

Thu Jan 9 , 2025
– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. बुधवार (8) रोजी शोध पथकाने 69 प्रकरणांची नोंद करून 59,400/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!