नागपूर :- दिनाक 27/02/2024 रोजी म.न.पा. मालमत्ता कर विभाग झोन क्र. 02 तर्फे जयंत मारोतराव धनवटे व इतर वार्ड क्र. 73म.न.पा. घर क्र. 1758/I/A रा. काचीमेंट, अमरावती रोड, नागपूर या मालमत्तेवरील सन 2008 ते सन 2024 पर्यंत 1,08,04,869/- इतकी थकबाकी या मालमत्तेवर आहे. या मालमत्ताधार यांना वारंवार सुचना व नोटीस दिलेले आहे. तरी सुध्दा यांनी आपल्या मालमत्तेची थकबाकी म.न.पा. कार्यालयात भरणा केलेला नाही. या बाबीनमुळे धरमपेठ झोन कार्यालयाने मालमत्तेवरती महाराष्ट्र महानगरपालिका च्या नियमानुसार जप्तीची कार्यवाही करून या मालमत्तेवर जप्तीचा बोर्ड लावलेला आहे. उपरोक्त कार्यवाही प्रकाश वराडे, सहा. आयुक्त, यांच्या नेतृत्वात कार्यवाही करण्यात आली कार्यवाही मध्ये सहा. अधिक्षक, बाहादुरसिंग एस. बरसे, कर निरीक्षक राहुल वासनीक, अशोक खाडे, अनिल महाजन, प्रदिप मांजरे, सुनील चव्हाण, विजय जाधव, विनोद मेश्राम, सुदर्शन वाहाणे, चेतन राठोड, प्रशांत लोखंडे व अतिक्रमण विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
मालमत्ता धारक कर थकबाकी वसुलीची धडक कार्यवाही धरमपेठ झोन क्र. 02
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com