नागपूर :- हुडकेश्वर पोलीसांचे पथक हे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना, त्यांनी मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून सापच्छा रखुन राष्ट्रीय महामार्ग क. ०६ विहीरगांव येथे महेंद्र बोलेरो पिक-अप वाहन क. एम.एच. ३१ एफ.सी. २४८९ यास थांबवून चालकास नांव पत्ता विचारले असता, त्याने रितीक गणपत चौधरी, वय २० वर्षे, रा. नागतरोली, वार्ड नं. ०२, भिवापुर, जि. नागपुर असे सांगीतले. वाहनाची पंचासमक्ष पाहणी केली असता, त्यामध्ये एकुण २७ जिवंत गोवंशीय जनावरांना निदर्यतेने बांधुन, अवैधरित्या कत्तलीकरीता नेत असल्याचे दिसुन आले, गोवंशीय जनावरे किंमती अंदाजे ३५,०००/- रू. तसेच, बोलेरो वाहन किंमती ३,००,०००/- रु. चा असा एकूण ३,३५,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नमुद जनावरे यांना गौशाला संस्था, नागपुर येथे जमा करण्यात आले आहे. आरोपीस अटक करण्यात आली. आहे. याप्रकरणी फिर्यादी पोअं. भुषण पेशने पोलीस ठाणे हुडकेश्वर नागपूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे हुडकेश्वर येथे आरोपीविरूध्द कलम ५(ब), ९ (अ) महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा-१९९५, सहकलम ११(१) (ड), प्राणी कुरता अधिनियम-१९६०, सहकलम ८३, १७७ मो.वा.का. अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपूर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, शिवाजीराव राठोड, अपर पोलीस आयुक्त (दक्षिण विभाग) नागपूर शहर, रश्मीता राव, पोलीस उप आयुक्त (परि. क. ०४), विनायक कोते, सहा. पोलीस आयुक्त (अजनी विच्छाग) यांचे मार्गदर्शनाखाली, पोनि, ज्ञानेश्वर भेदोडकर, पोनि. नागेशकुमार चातरकर, सपोनि, ओमप्रकाश भलावी, पोउपनि, शंकर जाधव, सफौ. नंदकिशोर तायडे, पोहवा, गणेश बौद्र, अविनाश श्रीरामे, नापोअं. राजेश मोते, विजय सिन्हा, पोअं. शैलेष शिंगाडे व भूषण पेशने यांनी केली.