नागपूर :- गुन्हेशाखा सामाजिक सुख्खा विभागाचे अधिकारी व अमलदार यांना माहीती मिळाली की, पोलीस ठाणे सोनेगांव हद्दीत लक्ष्मीविहार कॉम्प्लेक्स, वर्धा रोड येथे स्पर्श सलुन अकॅडमी अँड स्पा सेंटर येथे महिला व मुलींना देहव्यापारा करीता ग्राहकांना उपलब्ध करून देहव्यवसाय सुरू आहे. अशा मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून, सापळा रचुन रेड कारवाई केली असता, तेथे आरोपी मनोज उर्फ राजा रमेश बंदेवार, वय २४ वर्षे, रा. फ्लॅट नं. १०१, लक्ष्मीविहार अपार्टमेंट, वर्धा रोड, नागपूर हा स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता २४ पिडीत महिला व मुलींना पैशाचे आमिष देवून, देह व्यापाराकरीता ग्राहकांकडून पैसे घेवुन, पिडीतांना व ग्राहकाला घटनास्थळी देह व्यवसाय करीता जागा उपलब्ध करवून देह व्यवसाय करवितांना समक्ष मिळुन आला. त्याचे ताब्यातुन ०४ पिडीत महिला व मुलीची सुटका करण्यात आली. आरोपीचे ताब्यातुन ०२ मोबाईल फोन, रोख ४,५००/- रु. व इतर साहित्य असा एकुण ३१.६०५/-रु. या मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुध्द पोलीस ठाणे सोनेगांव येथे कलम १४३, ३ भा.न्या.सं., सहकलम ४, ५, ७ पिटा अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस मुद्देमालासह सोनेगांव पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपूर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, संजय पाटील अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपूर शहर, राहुल माकणीकर पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), सुधीर नंदनवार सहा. पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) यांचे मार्गदर्शानाखाली, सामाजिक सुरक्षा विभागाचे पोनि. रविंद्र नाईकवाड, सपोनि. शिवाजी नन्नावरे, नापोभं, शेषराव राऊत, पोनं, अश्विन मांगे, नितीन वासने, कुणाल मसराम, मपोहवा लता गवई व मपोअं. पुनम शेंडे यांनी केली.