रामटेक :-दिनांक १५/०६/२०२४ रोजी रात्री ०१.०० वाजता सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रामटेक उपविभागात पेट्रोलींग करीत असता मिळालेल्या गोपनीय माहितीचे अनुषंगाने टाटा योद्धा वाहनातून अवैध्य जनावरे कोवून कत्तलिकरिता भंडारा जिल्ह्यातून पोटिटोक, रामटेक मार्गे येणार आहे. अशा खात्रीशीर माहितीवरून सदर ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अंमलदार यांचेसह नाकाबंदी केली असता भरधाव वेगाने येणारे वाहन न थांबवता पळ काढल्याने त्याचा पाठलाग केला असता वाहन चालकाने त्याचे वाहन सोडून पळून गेला, सदर वाहनाची झडती घेतली असता त्यात दोरीने क्रूररित्या बांधून भरलेले ०४ गाई आणि ११ नग गोरे असे एकूण १५ गोवंश, किंमती १७०,०००/-रू. आणि पिकअप वाहन क्र. MH-30/BD- 3855 किंमती ७०००००/- रू. असा एकूण ८,७०,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त केला. पीडित जनावरांना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बहुउद्देशीय संस्था विडगाव नागपूर येथे दाखल करण्यात आलेले असून पो.स्टे. रामटेक येथे आरोपीतांविरूद्ध अप. क्र. ४०३/२०२४ कलम २७९ भा. द. वि. r/w ११(१) (घ), (ड) (च) प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधि. १९६०, r/w ५(अ), ९ महाराष्ट्र प्राणी सरक्षण अधि. r/w १८४ मो. वा. का. अन्वये वाहनचालक व मालकाविरुद्ध गुन्हा नोंद करून जप्त मुद्देमाल पुढील कार्यवाही कामी पो.स्टे. रामटेक यांचे ताब्यात देण्यात आला.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रमीण हर्ष ए. पोहार (भाषोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सपोनि किशोर शेरकी, पो.हवा. रोशन काळे, आशिष मुंगळे, नितेश पिपरोदे, शंकर मडावी, किशोर वानखेडे, उमेश फुलवेल, नापोशी विरेंद्र नरड, विपीन गायधने यांनी पार पाडली.