नागपूर :-अ) दिनांक १०.१२.२०२४ रोजी गुन्हेशाखा युनिट क्र. १ चे अधिकारी व अंमलदार यांनी त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे, पोलीस ठाणे जरीपटका हद्दीत प्लॉट नं. ७२, दयालु हाऊसिंग सोसायटी, जुना जरीपटका येथे राहणारा आरोपी नामे प्रज्वल बंसीलाल खांडेकर वय २३ वर्ष याचेवर रेड कारवाई केली. आरोपीचे ताब्यात शासनाने प्रतीबंधीत केलेला नायलॉन मांजा एकुण ४१ चकी विक्री करण्याचे उद्देशाने जवळ बाळगुन समक्ष मिळुन आल्या. आरोपीचे ताब्यातुन एकुण ६१,५००/- रू. वा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीने नमुद मुद्देमाल त्याचा साथिदार पाहिजे आरोपी नामे आतीफ रा. मोमीनपूरा याचे कडुन आणल्याचे सांगीतले, आरोपींचे कृत्य हे कलम ५, १५ पर्यावरण संरक्षण अधिनियम-१९८६, सहकलम २२३, ३(५) भा.न्या.सं. अन्वये होत असल्याने आरोपीविरूध्द कारवाई करण्यात आली.
ब) दिनांक १०.१२.२०२४ रोजी गुन्हेशाखा युनिट क. ४ चे अधिकारी व अंमलदार यांनी त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे, पोलीस ठाणे तहसिल हद्दीत सुझुकी अॅक्सेस गाडी क. एम.एच ४० सि.ई ३३४८ ला थाबवुन आरोपी नामे सुजल श्यामराव लोखंडे वय १९ वर्ष रा. श्रीवास नगर झोपडपट्टी, कोराडी, नागपूर याचेवर रेड कारवाई केली. आरोपीचे ताब्यात शासनाने प्रतीबंधीत केलेला नायलॉन मांजा एकुण २४ चकी विक्री करण्याचे उद्देशाने जवळ बाळगुन समक्ष मिळुन आला. आरोपींचे ताब्यातुन दुचाकी, मोबाईल फोन व चकी असा एकुण १,२६,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींचे कृत्य है कलम ५. १५ पर्यावरण संरक्षण अधिनियम-१९८६, सहकलम २२३, १२५ भा.न्या.सं. अन्वये होत असल्याने आरोपीविरूध्द कारवाई करण्यात आली.
क) दिनांक १०१२.२०२४ रोजी गुन्हेशाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी त्यांना मिव्ळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे, पोलीस ठाणे सोनेगाव हहीत एका स्वीफ्ट चार चाकी वाहनला थांबवुन रेड कारवाई केली असता, आरोपी नामे साहिल विवेक ठाकरे वय २३ वर्ष रा. अभिनव कॉलोनी, सोमलवाडा, नागपूर याचे ताब्यात शासनाने प्रतीबंधीत केलेला नायलॉन मांजा एकुण १०१ चकी विक्री करण्याचे उद्देशाने जवळ बाळगुन समश्व मिळुन आल्या. आरोपींचे ताब्यातुन वाहन क. एम.एच ३१ एफ. आर ७४०५, मोबाईल फोन व मांजाचकी असा एकुण ६,८४,०००/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीचे कृत्य हे कलम ५, १५ पर्यावरण संरक्षण अधिनियम-१९८६, सहकलम २२३ भा.न्या.सं. अन्वये होत असल्याने आरोपीविरूध्द कारवाई करण्यात आली.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपूर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, संजय पाटील अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपूर शहर, राहुल माकणीकर, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), अभिजीत पाटील, सहा, पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हेशाखा पोलीसांनी केली.