शासकिय कर्तव्यामध्ये अडथळा निर्माण करणा-या विरुध्द कारवाई

कोंढाळी :- अंतर्गत मौजा फन्ड अँड फुट समोरील १५ किमी पूर्व यातील फिर्यादी हे डायल ११२ सी एफ एस १३३६३३४७ चे काफलवा तात्काळ अमरावती नागपुर महामार्गवरील अनंत तारा हॉटेल समोर गेले असता तेथे तक्रारदार प्राची ठाकरे रा दुधाळा कोंढाळी हि व तिची आई चंदा नेहारे यानी सांगितले की ०४ इसम त्यांना अश्लील शिवीगाळ व मारहाण करून व त्यांचे दुकानात तोडफोड करून पांडऱ्या रंगाची चारचाकी गाड़ी घेवुन शिवा गावच्या दिशेने पळून गेले आहे, फिर्यादी यांनी शासकिय वाहनाने पाठलाग केला व वाहनातील नमुद इसमांना विचारपुस करीता बोलावले असता, आरोपीनी फिर्यादी व सहकारी अंमलदार यांना त्यांची कॉलर पकडली, जमीनीवर खाली पाडले व फिर्यादीचे छातीवर, पोटावर गळ्यावर लाथा व हाचबुक्यांनी मारहाण केली. त्यामध्ये त्यांचे गळ्याला व उजव्या हाथाच्या अंगठ्याला दुखापत झाली तसेच सहकारी अंमलदार त्यांना सुदधा लाथाबुक्यांनी मारहाण केली तसेच त्याठिकाणी आरोपी गौरव याची आई व बहिण यांनी कॉलर पकडुन थापड बुक्यांनी मारहाण केली. तरी वर नमुद चौघांनी संगनमत करून शासकिय कर्तव्यामध्ये अडथळा निर्माण करून, अश्लील भाषेतशिवीगाळ करून जिवाने मारण्याची धमकी दिली व मारहाण करून दुखापत केली.

सदर प्रकरणी फिर्यादी नामे- सरकारतर्फे सफ़ौ बाबुलाल राठोड पो स्टे कोंढाळी यांचे रिपोर्टवरुन पो.स्टे. कोंढाळी येथे आरोपी नामे १) अक्षय गजानन मेहर वय २४ वर्ष रा नाचनगाव जि वर्धा २) गौरव अशोकराव पेदाम वय २६ वर्ष रा शिवा ३) सुनिता पेदाम रा शिवा ४) आचल पेदाम वय २५ वर्ष शिवा यांचेविरोधात पोस्टे कोंढाळी येथे कलम ३५३,३३२,१८६,२९४,५०६,३४ भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देशमुख हे करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जागतिक चॅम्पियनशिपमध्ये भारतीय तिरंदाजांच्या अनुकरणीय कामगिरीचे उपराष्ट्रपतींनी केले कौतुक

Mon Aug 7 , 2023
नवी दिल्‍ली :-उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी आज वरिष्ठ सभागृहात बर्लिन, जर्मनी येथे झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारतीय तिरंदाजांच्या कामगिरीचे कौतुक केले. उपराष्ट्रपती म्हणाले की, क्रीडापटूंची कामगिरी राष्ट्राला प्रेरणा देणारी आहे. जागतिक तिरंदाजी चॅम्पियनशिपमधील आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल भारतीय तिरंदाजांचे कौतुक करताना उपराष्ट्रपती म्हणाले की, क्रीडापटूंच्या यशामुळे क्रीडा क्षेत्रातली आपली प्रगती दिसून येते, हे यश खेळाडूंची मेहनत आणि समर्पणाचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com