पोलीस स्टेशन काटोल :- अंतर्गत आयुडिपी काटोल १ किमी पूर्व यातील फिर्यादीचे बंद गोडावून मधुन तुरीचे ९ कट्टे प्रत्येकी ६० किलो किंमती ६,०००/-रू कट्टा असा एकून ५४,०००/- रु या माल दिनांक २९.०५.२३ ते १०.०६.२३ चे ०१.०० ते ०७.०० वा दरम्यान यातील नमुद आरोपीतांनी चोरून नेला आहे.
सदर प्रकरणी फिर्यादी नामे- तुषार दत्तराव राजुरकर वय ३५ य आयुडिपी काटोल जि नागपुर यांचे रिपोर्टवरून पोस्टे काटोल येथे आरोपी नामे धनपाल सोनटक्के रा रामपठार ता काटोल २) राकेश वरटी रा. काटोल यांचे विरुद्ध कलम ३८० भादवी अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास विकास वाइलकर पोस्टे काटोल हे करीत आहे.