कन्हान :- अंतर्गत मौजा जय दुर्गा हॉलचा मागे आरोपीचे घरासमोर कांद्री कन्हान ता. पारशिवनी येथे दिनांक २८/०३/२०२४ चे ०९.०० वा. ते ०९.३० वा. दरम्यान फिर्यादी नामे अंकुश शांतालाल केसरवाणी, वय ४० वर्ष, रा. नुतन सरस्वती स्कुल के सामने वार्ड ०४ फांद्री ता. पारशिवनी याने आरोपी नामे सुनिल मधुसुधन तिवारी, वय ३५ वर्ष, रा. जय दुर्गा हॉल चा मागे कन्हान तह. पारशिवनी याला उधार दिलेले पैसे मागण्यासाठी आरोपीच्या घरी गेले असता त्याचा राग मनात धरून आरोपीने त्याचा जवळील गनने फिर्यादीला जिवे मारण्याच्या उद्देशाने गोळी झाडली आरोपीची आई मधात आली असल्याने तिचा छातीला व डाव्या हाताला गोळी लागून जखमी झाली.
सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रीपोर्ट वरून पोस्टे कन्हान येथे आरोपीविरूद्ध कलम ३०७ भादंवि, सहकलम ३,२५ भाहका. अन्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपीस अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास कन्हान पोलीस करीत आहे.