वाहन व मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीस अटक, एकूण किमती ६,७५,०००/- चा मुद्देमाल जप्त

नागपूर :- पोलीस ठाणे सदर हद्दीत जुना स्मॉल फायनंन समोर, एस. के टावर, बैरामजी टाउन, सदर, नागपुर येथे फिर्यादी निरज माखनलाल यादव वय २४ वर्षे, रा. मानव नगर, टेकानाका, कपिलनगर यांनी त्यांची हिरो होन्डा पॅशन प्रो मोटरसायकल क. एम.एच ३१ सि.डी ६२९५ किमती १५,०००/- ची लॉक करून ठेवली असता. कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली, फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हयाचे तपासादरम्यान सदर पोलीसांचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करीत असतांना मंगळवारी बाजार, सदर येथे पोलीसांना पाहुन एक इसम दुचाकीवर, लाल रंगाचे बॅगेसह संशयीतरित्या वेगाने पळुन जावु लागल्याने त्याचा पाठलाग करून त्यास गोवा कॉलोनी, मंगळवारी पुलाखाली पकडले, व ताब्यात घेवुन मोटरसायकल बाबत विचारपूस केली असता आरोपीने नमुद वाहन चोरी केल्याचे कबुल केले. आरोपीस त्याचे जवळील लाल बॅग बाबत विचारपूस करून त्याची झडती घेतली असता त्याचे बॅगेत न्यूज पेपर मध्ये गुडाळलेले वेगवेगळ्या कंपनीचे एकूण ३३ अँड्रॉईड मोबाईल दिसुन आले. मोबाईल बाबत आरोपीची सखोल विचारपूस केली असता आरोपीने नमुद मोबाईल हे नागपूर शहरातील बाजारातुन लोकांचे लक्ष विचलीत करून चोरी केल्याचे सांगीतले. आरोपीस त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने आपले नाव शेख रियाज शेख मुजाहीद वय २३ वर्ष रा. डाकबंगला, मोतीझरना, जि. साहेबगंज, झारखंड, ह.मु गुलशन नगर, गजभिये यांचे घरी किरायाने, यशोधरानगर, नागपूर असे सांगीतले, आरोपीस वाहन चोरीचे गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे. आरोपीचे ताब्यातुन मोटरसायकल व ३३ अँड्रॉईड मोबाईल असा एकुण किमती ६,७५,०००/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी हा मोबाईल चोरी टोळीचा सदस्य असल्याचे शक्यतेच्या दृष्टीकोणातुन पुढील तपास सुरू आहे.

वरील कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त (परि क्र. २), सहा. पोलीस आयुक्त सदर विभाग यांने मार्गदर्शनाखाली वपोनि मनिष ठाकरे, पोउपनि कुणाल धुरट, पोहवा सतिश गोहत्रे, मिलींद भगत, आशिष बहाड पोअ. सैय्यद हवीय, सचिन कावळे, पंकज तिवारी, बालीजी गुट्टे यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्राणातिक अपघात करणारा आरोपी ताब्यात

Thu Feb 22 , 2024
नागपूर :- फिर्यादीचे मामा विजय राजेन्द्रप्रसाद खंडेलवाल वय ६६ वर्ष रा. प्लॉट नं. ३३, आजमशाह ले-आउट, नंदनवन, नागपूर हे त्यांचे अॅक्टiव्हा गाडी क. एम.एच ३१ डी आर २३४७ ने शंकर हार्डवेअर, लोहाओली, येथे मॅनेजरचे कामावर गेले होते. तेथुन दुकानाचे कामानिमीत्त कॅनरा बँक अबिडकर चौक, येथे अॅक्टीव्हा गाडीने जात असता. आंबेडकर चौक, मेट्रो स्टेशन जवळ त्यांचे मागुन येणान्या टैंकर क. एम.एन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com