सावनेर :- पोलीस स्टेशन वे हददीत मागील काही महिन्यात झालेल्या मोटार सायकली चोरी वे गुन्हे उघडकीस आणणे कामी पोस्टे. चे डी.वी. पथक हे मोटार सायकली चोरी करणारे इसमांचा हालचालीवर विशेष लक्ष्य ठेवुन असता पोस्टे, परीसरात गस्त करीत असतांना एक इसम हा संशयीत रित्या दिसुन आला त्यास पकडण्याचा प्रयत्न केले असता तो पोलीसांना पाहुन पळु लागला पोलीसांनी त्याचा मोठ्या शिताफितीने पाठलाग करून त्यास पकडुन त्यास मोटार सायकल चोरी बाबत विचारपुस केली असता त्याने आपले नाव अमर बंडु सराटे, वय १९ वर्ष राह. आजनी शेरडी ता. सावनेर असे सांगुन अंदाजे १५ दिवसा आधी पारडी रिठी शिवारातील एका शेताजवळुन मोटार सायकली चोरून आणल्याचे सागितल्याने त्यास पोस्टे. ला आणुन गुन्हयात अटक करून पोलीस कॅस्टडी रिमांड दरम्यान आरोपीने पोस्टे. सावनेर येथे दाखल अप क्रः १०८२/२०२३ कलमः ३७९ भा.द.वि. मधील चोरीस गेलेली हिरो होण्डा कंपनीची एलेंडर प्लस मो.सा. क्रः MH 40 CP 0990 किं. ४०,०००/- रू. ची जप्त करण्यात आली तसेच आरोपीकडुन सखोल व बारकाईने विचारपुस केली असता त्यांनी पोलीस स्टेशन केळवद येथे दाखल अप क्रः १०८२/२०२३ कलमः ३७९ भा.द.वि. मधील चोरीस गेलेली हिरो होण्डा कंपनीची स्लेंडर प्लस मो.सा. क्रः MH 40 CP 0990 किं. ४०,०००/- रू. ची जप्त करण्यात आली तसेच आरोपीकडुन सखोल व बारकाईने विचारपुस केली असता पोस्टे. सावनेर येथे दाखल अप क्रः १०८४/२०२३ कलमः ३७९ भा.द.वि. मधील चोरीस गेलेली हिरो होण्डा कंपनीची CD 100 मो.सा. क्रः MH 32 E 6044 किं. १०,०००/- रू. ची जप्त करण्यात आली तसेच पोलीस स्टेशन केळवद येथे दाखल अप क्रः १२२/२०२३ कलमः ३७९ भा.द.वि. मधील चोरीस गेलेली होण्डा कंपनीची एक्टिवा मोपेड. क्रः: MH 40 BB 3105 किं. २५,०००/- रू. ची जप्त करण्यात आली तसेच पोस्टे. खापा येथे दाखल अप क्रः ३३९/२०२३ कलमः ३७९ भा.द.वि. मधील चोरीस गेलेली हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मो.सा. क्रः MH 40 CN 1554 किं. ५०,०००/- रू. ची जप्त करण्यात आली अश्या प्रकारे वरील आरोपी कडुन पोलीस स्टेशन सावनेर, पोलीस स्टेशन केळवद, तसेच पोलीस स्टेशन खापा येथील एकुण चार मोटर सायकली एकुण किंमती. १,२५,०००/- रू. या मुददेमाल जप्त करण्यात आली असुन एकुण चार गुन्हे उघडकीस आणले आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधिश्वक संदिप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी, काटोल विभाग काटोल बापू रोहम यांचे मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक रविन्द्र मानकर ठाणेदार सावनेर यांचे नेतृत्वाखाली सहा. पो.निरी. शरद भस्मे, सफौ./१५२२ गणेश राय, पोहवा./१९३९ रवि मेश्राम, पोहवा./१९१४ रविन्द्र चटप, पोशि./ २२१६ दाऊद मोहम्मद यांनी केली आहे.