नागपूर :- पोलीस ठाणे जुनी कामठी हद्दीत नेताजी चौक, एस.बी.आय चे एटीएम मध्ये दोन अज्ञात ईसम एटीएम मशीन मध्ये छेडछाड करून १५,०००/- रू. काढुन चोरून नेले. अशा फिर्यादी स्वप्नील मारोतराव गभने वय ३६ वर्ष रा. नेहरू नगर, नंदनवन, नागपूर यांनी दिलेल्या तकारीवरून पोलीस ठाणे जुनी कामठी येथे दोन अज्ञात आरोपींविरूध्द कलम ३०५, ३२४(३), ३(५) भाज्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हेशाखा युनिट क. ४ ये अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून व तांत्रीक तपास करून व पोहवा. सुनिल ठवकर यांनी काढलेल्या माहितीवरून त्यांनी जयस्तंभ चौक जवळ, एका स्वीफ्ट कार क. एम.एच ०४ एच. एफ ८८४० ला थांबवून आरोपी क. १) जितेन्द्र रामदेव पाल, वय २४ वर्षे, रा. ग्राम पूरेजनई, ता. लालगंज, जि. प्रतापगढ़, उत्तर प्रदेश २) अखिलेश नन्हे पाल वय २६ वर्ष रा. रामगडरेला, ता. लालगंज, जि. प्रतापगढ़, उत्तर प्रदेश यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, त्यांनी वर नमुद गुन्हा त्यांचा साथिदार पाहिजे आरोपी क. ३) विमल पाल वय २४ वर्ष रा. अहेमापूर, ता. कुंडा, लालगंज, जि. प्रतापगढ़, उत्तर प्रदेश यांचेसह संगणमत करून केल्याची कबुली दिली. ताब्यात घेतलेले दोन्ही आरोपींना अधिक विचारपूस केली असता, त्यांनी नागपूर शहरातील पोलीस ठाणे जुनी कामठी, नविन कामठी, गिट्टीखदान, कळमणा व कपिलनगर येथे एटीएम फोडुन चोरी केल्याची कबुली दिली, तसेच त्यांनी अकोला, बुलडाणा, नदिड, पुणे व मुंबई याठीकाणी सुध्दा एटीएम मधुन योरी केल्याचे सांगीतले. आरोपींचे ताब्यातुन रोख ३४,५००/- रू., तिन मोबाईल फोन, एक स्वीफ्ट कार, एम बंग, विवीध बँकेचे एटीएम कार्ड, पेचकस, लोखंडी धातुच्या पट्टया असा एकुण किंमती अंदाजे ४१५,०५०/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना मुद्देमालसह पुढील कारवाई करीता जुनी कामठी पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपूर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, संजय पाटील अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपूर शहर, राहुल माकणीकर, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), अभिजीत पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, पोनि. कमल्लाकर गड्डीमे, पोउपनि. अविनाश जायभाये, पोहवा. सुनिल ठवकर, रोशन तिवारी, अजय यादव, अतुल चाटे, देवेन्द्र नवघरे, नापोअं. नितीन वर्मा, प्रकाश राजपल्लीवार व लिलाधर भेंडारकर यांनी केली.