– स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामिणची कारवाई
नागपूर :- पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिनांक ११/०१/२०२४ रोजी नागपुर उपविभागात अवैध धंद्यांवर आळा घालणे संबंधाने पेट्रोलिंग करीत असताना पोलीस ठाणे बुट्टीबोरी हद्दीतून चंद्रपूर ते नागपूर रोडनी एका कंटेनर वाहन क्र. HR 55/S 2346 मधुन अंमली पदार्थ (गांजा) वी वाहतुक होत असल्याची खात्रीपूर्वक माहिती मिळाल्याने पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार यांचे आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस स्टेशन बुट्टीबोरी परिसरात चंद्रपूर ते नागपूर रोड येथे नाकाबंदी दरम्यान कंटेनर क्र. HR 55/S 2346 चांचवुन वाहनाची झडती घेतली असता कंटेनर वाहनात चालक आरोपी नामे- १) शब्बीर जुम्मे खान वय ३० रा, मनपूर करमाला, जोगवा ता. रामगड जी. अलवर (राजस्थान) हा त्याचा सोबती २) मूनवर आझाद खान वय २८ रा. शहापूर नगली ता नुह जी. मेवात (हरियाणा) याचे मदतीने कटेनर वाहनामध्ये कौबनचे ड्रयव्हर सिटचे मागील भागाने कंटेनरला छुप्या पद्धतीने कप्पा तयार करून त्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या एकुण १५ बोरीमध्ये गुंगीकारक वनस्पती गांजा बाळगून वाहतूक करतांना मिळुन आल्याने त्यांचे ताब्यातुन १) ४९५ किलो ६०० ग्रॅम किंमती ४९,५६०००/-रू. २) कंटेनर वाहन क्र. HR-55/S- 2346 किंमती २०,००,०००/-रू. ३) दोन मोबाईल संच किमती २०,०००/- रू. असा एकूण ६९,७६०००/-रू. चा मुद्देमाल जप्त करून वरील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. अटक आरोपीताकडुन गाडीचा मालक ३) गाडी मालक हाफिज जुमे खान रा. यमुना नगर (हरियाणा) असल्याचे व अंमली पदार्थ गांजा मुद्देमाल हा सुनिल नावाचे इसमाचा असुन दोन्ही आरोपीतांना गुन्हयात फरार दाखविण्यात आले आहे. अटक आरोपीतांनी चौकशीमध्ये वरील फरार आरोपींचे सांगण्यावरून विशाखापट्टणम येथुन बिहार कडे घेवुन जात असल्याची माहिती दिली. आरोपीतांविरुद्ध पोलीस ठाणे बुटीबोरी येथे कलम २०, २२ एन. डी. पी. एस. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून जप्त मुद्धेमाल, दोन आरोपी व कागदपत्रे पुढील कायदेशीर प्रक्रिये करीता पोलीस ठाणे बुट्टीबोरी यांचे ताब्यात देण्यात आले असुन आरोपींचा दिनांक १५/०१/२०२४ पीसीआर पेण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार (भा.पो.से), अपर पोलीस अधिक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक आशीष मोरखडे, बडूलाल पांडे पोलीस हवालदार अरविंद भगत, गजेंद्र बौधरी, मिलिंद नांदुरकर, संजय बांते, मयूर डेकळे, सत्यशील कोठारे, पोलीस नायक अमृत किनगे, रोहन डाखोरे, पोलीस अंमलदार राकेश तालेवार चालक पोलीस अंमलदार आशुतोष लांजेवार, सुमित बांगडे, सायबर सेलचे सतिश राठोड, मृणाल राऊत यांचे पथकाने पार पाडली