नागपूर :- पोलीस ठाणे मानकापुर हद्दीत प्लॉट नं. ०५, गिता नगर, झिंगाबाई टाकळी, नागपुर येथे आरोपी १) मनोज एकनाथ राजुरकर, वय ३० वर्षे व २) एकनाथ महादेव राजुरकर, वय ६५ वर्षे हे राहत असुन आरोपी क. १ याचा परीचीत फिर्यादीचा मुलगा नामे राकेश प्रकाश गमे, वय २५ वर्षे, रा. एम.बि. टाउन, मिनीमाता नगर, आटा चक्की जवळ, नागपूर याने मनोज याची मोटारसायकल घेवुन गेला होता. दिनांक २६.०६.२०२४ वे १५.३० वा. चे सुमारास मोटारसायकल परत करण्याकरीता आरोपीचे घरी आला असता, आरोपी व फिर्यादीचा मुलगा यांचेत वाद होवून भांडण झाले. आरोपीतानी संगणमत करून, फिर्यादीचे मुलास जीवानिशी ठार मारण्याच्या उद्देशाने लाकडी दांड्याने, विटाने व दगडी पाट्याने डोक्यावर मारून गंभीर जखमी केले. जखमी याला उपाचाराकरीता मेयो हॉस्पीटल येथे नेले असता, डॉक्टरांनी तपासुन मृत घोषीत केले.
याप्रकरणी फिर्यादी ताईबाई प्रकाश गमे, वय ५० वर्षे, एम. बि. टाऊन, मिनीमाता नगर, आटा चक्की जवळ, नागपूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे मानकापुर येथे पोउपनि अमोल काबळे यांनी आरोपीविरूध्द कलम ३०२, ३४ भा.दं.वि. अन्वये गुन्हा दाखल करून, दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.