कोराडी :-फिर्यादी मोना विलास हिंगणकर वय ४० वर्ष रा. दत्तमंदीर मागे, गणेशपेठ, नागपूर येथे किरायाने राहतात त्यांचे पती विलास देवचंद हिंगणकर वय ४५ वर्ष रा. सिमेंट विट फॅक्ट्री सुरादेवी, कोराडी, नागपूर यांच्या मध्ये घरगुती वाद झाल्याने ते वेगवेगळे राहतात.
विलास देवचंद हिंगणकर हे राहत असलेले ठिकाणी त्यांची सत्यम सिमेंट विटाची फॅक्ट्री असुन त्यांचा भाऊ आरोपी १) चंदन देवचंद हिंगणकर वय ३८ वर्ष ग. प्लॉट नं. २. साई नगर, दिघोरी, नागपूर यांचे मध्ये मध्य प्रदेश येथील वडीलोपार्जीत जागेवरून आपसी वाद होता. व आरोपी क. २) मनोहर कवडू दुभवर्वे तय ४८ वर्ष हा विलास हिंगणकर यांचे कंपनीत चालक म्हणून काम करीत होता व तेथेच राहत होता. दिनांक ०८.०६.२०२३ चे २१,०० वा ते २१.३० वा. चे दरम्यान विलास हिंगणकर हे घरी असतांना आरोपी क. १ पाने वडीलोपार्जीत जागेवरून विलास हिंगणकर याचे सोबत वाद करून आरोपी क. २ याचे सोबत संगणमत करून विलास हिंगणकर यास कोयत्याने वार करून जिवानीशी ठार केले. व गुन्हयाचा पुरावा नष्ट करण्याचे उद्देश्याने तेथे बाजुलाच जे.सी.बीचे सहाय्याने गड्डा करून त्या मध्ये मृतक विलास हिंगणकर याचे प्रेत पुरले व त्यावर कंपनीतील राखड़ टाकली होती. पोलीस ठाणे कोराडी येथील तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांना गुप्त बातमीद्वारा मार्फत मिळालेल्या माहिती वरून सापळा रचुन आरोपी क, २) मनोहर कवडु दुधबर्वे वय ४८ वर्ष यास ताब्यात घेवुन सखोल विचारपूस केली असता, त्याने मृतकाचा भाऊ आरोपी क. १ सोबत मिळुन नमुद गुन्हा केल्याचे सांगीतले, यावरून आरोपी क. १ व २ यांना ताब्यात घेवुन त्यांनी सांगीतले प्रमाणे विलास हिंगणकर याचा मृतदेह बाहेर काढुन दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मृतकाच्या पत्नी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे कोराडी येथे सपोनि रघुनाथ कळके यांनी आरोपींविरूध्द कलम ३०२, २०१, ३४ भा.दं.वी अन्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.
वरील कामगिरी पोलीस उप आयुक्त परि क. ५. निकेतन कदम, सहा पोलीस आयुक्त जरीपटका विभाग संतोष खांडेकर यांचे मार्गदर्शनात वपोनि नाईक, पोउपनि साईनाथ केन्द्रे, दिपक भरती, योगेश ताथोडे, मनोज अंधारे, पोहवा राजेश चंदेल, नापोअ. राकेश पराची, पोअ, प्रकाश जाधव, बबन वैद्य, राहुल कनोजीया यांनी केली.