जीवनीशी ठार मारणाऱ्या आरोपीस अटक

नागपूर :- पोलीस ठाणे हिंगणा हद्दीत डोंगरगाव ते आर के महाविद्यालय, हिंगणा दरम्यान आरोपी सौरभ उर्फ बादशाह बस्ताराम पंचराम वय १९ वर्ष रा. चिंचभवन, राजाराम नगर, वर्धा रोड, नागपूर व त्यांचे ईतर अल्पवयीन साथिदार यांनी गैरकायदयाची मंडळी जमवुन जुन्या भांडणाचे सेटलमेंट करणे करीता (मृतक) सक्षम कैलास तिनकर वय १७ वर्ष रा. शिरूळ, पोस्ट रिवेरा, हिंगणा, जि नागपूर यास व त्याचे मित्रास बोलाविले. ते तेथे गेले असता आरोपी व विधी संघर्षबालक यांनी शिवीगाळ करून त्यांना हातबुक्कीने मारहाण केली. सक्षमचा मित्र पळून गेला. व सक्षम यास आरोपीने चाकुने व ईतर यांनी कटर, लाकडी दंडापाने मारहाण करून गंभीर जखमी केले. गंभीर जखमी सक्षम यास उपचाराकरीता एम्स हॉस्पीटल, जामठा येथे दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी २२.३० वा. सक्षम यास तपासून मृत घोषीत केले.

याप्रकरणी फिर्यादी अंतकला कैलास तिनकर वय ४४ वर्ष शिरूळ पोस्ट रिधोरा, हिंगणा, जि. नागपूर यांनी दिलेल्या तक्रारी वरून पो. ठाणे हिंगणा येथे पोउपनि विरेन्द्र भोसले  यांनी आरोपीविरूध्द कलम ३०२, ३२३, ५०४, ५०६ (व), १४३, १४७, १४८, १४९ भादवि सहकलम ३७, १३५ म.पो. का अन्वये गुन्हा नोंदवून आरोपी सौरभ उर्फ बादशाह बस्ताराम पंधराम वय १९ वर्ष यास अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विश्वासघात करून चोरी करणाऱ्या आरोपीस अटक

Wed Aug 30 , 2023
नागपूर :-आशिष सुधाकरराव कोवळे, वय ३९ वर्ष रा. प्लॉट क्र. ०५. शिवदर्शन अपार्टमेंट, पटेल नगर, काटोल रोड, नागपूर यांनी भागीदारी तत्वावर पो. ठाणे बजाजनगर हददीत बजाजनगर चौकात द कॉमन ग्राउंड स्पोर्टस कॅफे अॅण्ड रेस्ट्रो नावाचे हॉटेल सन २०२० मध्ये सुरू केले. सदर हॉटेल पाहण्याकरीता व हॉटेलचे स्टॉफवर नजर ठेवणेकरीता फिर्यादी व त्याचे पार्टनर यांनी आरोपी अर्जुन प्रदीप जयस्वाल वय ३१ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com