नरखेड :- अंतर्गत १३ कि. मी. अंतरावरील खैरगाव येथे दिनांक ०१/११/२०२३ १२.४५ वाजता दरम्यान फिर्यादी नामे- सुरज मारोतराव नारनवरे (महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण शाखा खैरगाव) वय ३० वर्ष, रा. नरखेड हा राज्य विदयुत वितरण शाखा खरगाव येथे तिन वर्षापासुन वरीष्ठ तंत्रज्ञान या पदावर कार्यरत आहे. फिर्यादीची टिम मिळुन आरोपी नामे- ज्ञानेश्वर पांडुरंग बनाईंत वय ४० वर्ष, रा. खैरगाव याने दोन महिन्यापासून ईलेक्ट्रीक बिल न भरल्यामुळे आरोपीला माहीती देवुन घराचे व दुकानाचे लाईन कापणे करीता गेले होते व ऑफीस मध्ये फिर्यादी व पवन वरोकर हे हजर होते. तेव्हा आरोपी हा ऑफीस मध्ये आला व म्हणाला की, तुम्ही आमचे घरची व दुकानाची लाईन का कापली असे म्हणुन फिर्यादीस शिवीगाळ केली त्यावर फिर्यादीने म्हटले की, तु तुझ्या घरची लाईट बिल भरलेले नाही असे म्हणताच आरोपी याने फिर्यादीये कॉलर पकडुन मारण्याची धमकी दिली.
सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. नरखेड येथे आरोपीविरुद्ध कलम ३५३, ५०४, ५०६ भादंवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बादरे, पोस्टे नरखेड हे करीत आहे.