नागपूर :- फिर्यादी प्रेमदास दामोदर पाटील, वय ३९ वर्षे, रा. प्लॉट नं. १२०, निलकमल नगर, नरसाळा, हुडकेश्वर, नागपूर हे त्यांची ग्रे रंगाची अॅक्टीव्हा मोपेड क. एम.एच. ४९ वि.डी ६२४५ ने जात असता, पोलीस ठाणे नंदनवन हद्दीत, सेंट झेव्हीअर शाळेजवळ, हिवरी नगर रोडवर, ऊभी करून लघुशंके करीता गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीची दुचाकी चोरून नेली, फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे नंदनवन येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०३(२) भात्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाचे तपासात नंदनवन पोलीसांनी गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून आरोपी नामे शाकीब शेख अब्दुल कलाम शेख, वय २३ वर्षे, रा. हिवरी नगर, नाकाडे बिल्डींग जवळ, नागपूर यास ताब्यात घेवुन, विचारपूस केली असता, त्याने वर नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीचे ताब्यातुन गुन्हयात चोरी केलेली अॅक्टीव्हा जप्त करण्यात आली. आरोपीस अधिक सखोल विचारपूस केली असता, त्याने पोलीस ठाणे नंदनवन हद्दीतुन काळया रंगाची पेंशन प्रो क. एम.एन ३९ डी. एक्स ०६२७ ची, तसेच ग्रे रंगाची होन्डा शाईन क. एम.एच ४९ एल ८१४९ ही सुध्दा चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीने ताब्यातून तिन्ही दुचाकी वाहने किंमती अंदाजे एकुण ८०,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. नंदनवन पोलीसांनी वाहन चोरीचे तिन गुन्हे उघडकीस आणुन आरोपीस अटक केलेली आहे. पुढील तपास सुरू आहे.
वरील कामगिरी रविंद्र सिंघल, पोलीस आयुक्त नागपुर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, शिवाजीराव राठोड, अपर पो. आयुक्त (दक्षिण विभाग) नागपुर शहर,रश्मीता राव, पोलीस उप आयुक्त (परी, क. ४), विनायक कोते, सहा. पोलीस आयुक्त (सक्करदरा विभाग), यांचे मार्गदर्शनाखाली, वपोनि विनायक कोळी, पोनि, जयवंत पाटील (गुन्हे), सपोनि, प्रशांत साबळे, पोउपनि. प्रविष्ण राऊत, पौहवा. आशिष तितरमारे, संजय वरवाडे, पोअं. प्रदीप भदाडे, सोमेश्वर गुगल, राहुल खळतकर, प्रविण मरापे व राकेश यांनी केली.