नागपूर:- पो. ठाणे बेलतरोडी हद्दीत, बेसा डेअरी, लॉ नं. ५२, मस्जीद जवळ राहणारे फिर्यादी सचिन मधुकर उके वय २८ वर्ष यांनी त्यांची हिरोहोन्डा स्प्लेंडर गाडी क्र. एम. एच ४० एक्स ५१८३ ही लॉक करून ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून पो. ठाणे बेलतरोडी येथे अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३७९ भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता..
सदर गुन्हयाचे तपासा दरम्यान बेलतरोडी पोलीसांनी तांत्रीक तपास करून मिळालेले माहिती वरून सापळा रचून, एका विधीसंघर्षग्रस्त बालकास वर नमुद वाहनासह ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याने पोलीस ठाणे बेलतरोडी हद्दीत वर नमुद वाहन चोरी केल्याची कबुली दिली. विधी बालकाचे ताब्यातून गुन्हयातील चोरीस गेलेले वाहन जप्त करण्यात आले. विधीसंघर्षग्रस्त बालकास अधिक सखोल विचारपूस केली असता तो त्याचा साथीदार मॅकेनिक आरोपी महेंद्र चरणदास राउत वय ३२ वर्ष रा. प्लॉ. नं. ३२ वसंतनगर, अजनी याचे मदतीने चोरी केलेल्या वाहनाचे रंग व एसेसरीज बदलुन विक्री करीत असल्याचे सांगीतले. नमुद आरोपीचे गरेन ने झडतीमध्ये विधीसंघर्षग्रस्त बालक व आरोपीने पोलीस ठाणे बेलतरोडी हद्दीतील दोन वाहने व पोलीस ठाणे कळमणा हद्दीतील एक वाहन चोरी केलेले २) मोटर सायकल क्र.एम.एच ३१ डि. एक्स ३३५०, ३) पेशन मोटर सायकल के. एम. एच. ४०. बि. एक्स ०७१४) ग्रे रंगाची अॅक्टीव्हा मोपेड क. एम. एन ४९ एम. ७०८३५) काळया रंगाची टि.व्ही.एम. सेंट्रा मोटर सायकल क.एम.एच २७ एस. ९७६८ असे मिळून आल्याने आरोपीच्या ताब्यातुन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या. आरोपीकडुन एकुण तिन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणुन एकूण पाच वाहने किंमती ३,२०,०००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
वरील कामगिरी पोलीस उपआयुक्त, परि क. ०४. मा. सहायक पोलीस आयुक्त, अजनी विभाग वपोनि मुकुंद कवाडे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि पंकज काकडे, स.फौ. राजेश घुगे, पोहवा शैलेश बदोडकर, नंदकिशोर तायडे, अरूण सातपुते, नापोअ सुहायस शिंगणे, समेंद्र बोपचे, विवेक श्रीपाद यांनी केली.