नागपूर :- पो. ठाणे लकडगंज हद्दीत, प्लॉट नं. ८६९, जुनी मंगळवारी, राहटे हॉस्पीटल जवळ, नागपुर येथे राहणारे निलेश गणपतराव उमरेडकर वय ३३ वर्ष यांनी त्यांची होन्डा कंपनीची मोटरसायकल क्र. एम.एच ४९ आर ९४१९ किमती ४०,०००/- घरासमोर लॉक करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून पो. ठाणे लकडगंज येथे अज्ञात आरोपी विरुध्द कलम ३७९ भादवि अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. नमुद गुन्हा गुन्हे शाखा युनिट ४ चे अधिकारी व कर्मचारी यांनी उघडकीस आणुन आरोपी ऋषीकेश विशाल मेश्राम वय २६ वर्ष रा. बिल्डींग नं. वि/२६ प्रधानमंत्री आवास योजना, वाठोडा, नागपूर यास अटक करून लकडगंज पोलीसांचे ताब्यात दिले होते.
लकडगंज पोलीसांनी आरोपीची सखोल विचारपूस केली असता आरोपीने त्याचा साथिदार नाम मनिष रामदयाल झेमडे वय २३ वर्ष रा. दिपसिंग नगर, प्लॉट नं. ३, समता नगर पोलीस ठाणे, कपिलनगर याचेसह केल्याची कबुली दिल्ली व गुन्हयातील वाहन स्वप्नील देवेनसिंग रघुवंशे वय २४ वर्ष रा. गुमतरा बिच्छवा, जि छिंदवाड़ा, मध्य प्रदेश यास विक्री केल्याचे सांगीतले दोन्ही आरोपीना अटक करून त्यांची पोलीस कोठडी प्राप्त केली व मोटरसायकल जप्त करण्यात आली. आरोपींची सखोल विचारपूस केली असता आरोपींनी २) पोलीस ठाणे लकडगंज हदीतून हिरो होन्डा स्प्लेडर मोटरसायकल क एम.एच ४९ टि ०८६९ किमती १५,०००/- रु. ३) प्लेझर गाडी के. एम. एच ३१ डी.टी. ४०२४ किमती २०,०००/- रु. ४) होन्डा शाईन मोटरसायकल क. एम.एच ४९ ए.एफ. ०६६५ किमती २५,०००/- रुची ५) पोलीस ठाणे ईमामवाडा हद्दीतून हिरो होन्डा स्लेडर प्रो मोटरसायकल क्र. एम.एच ४९ ए २५३५ किमती ४००००/- रु ६) पोलीस ठाणे पाचपावली हद्दीतून होन्डा शाईन मोटरसायकल क्र. एम.एच ४९ व्ही ४३५२ किमती (३०,०००/- रु ७) पोलीस ठाणे जरीपटका हद्दीतून होन्डा शाइन मोटरसायकल क. एम.एच ४९ ए.बी २९४९ किमती ३०,०००/- रु ८) पोलीस ठाणे सक्करदरा हदीतून हिरो होन्डा स्प्लेंडर प्लस मोटरसायकल क्र. एम.एच ४० सि. पो ३८८७ किमती ४०,०००/- रु ९) पोलीस ठाणे नंदनवन हद्दीतून हिरो होन्डा आप स्मार्ट स्प्लेंडर मोटरसायकल क एम.एच ४९ ए.सी ६५३९ किमती २५,०००/- रू १०) पोलीस ठाणे अजनी हदीतुन होन्डा शाईन मोटरसायकल क. एम. एच. ४९ झेड ४८५५ किमती ४०,०००/- रू ११) पोलीस ठाणे हुडकेश्वर हदीतून टि.व्ही.एस स्पोर्ट मोटरसायकल क. एमएच ४९ ५५८२ किमती ३०,०००/- असे एकूण वारा वाहने चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीचे ताब्यातुन एकूण बारा मोटरसायकली किमती अंदाजे ३,३५,०००/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
वरील कामगिरी पोलीस उप-आयुक्त (परि क. ३), मा. सह पोलीस आयुक्त लकडगंज विभाग यांचे मार्गदर्शना खाली व.पो.नि. अतुल सबनीस, पोनि गुन्हे अमीता जयपूरकर, पोउपनि योगेश कोरडे, पोहवा अरुण धर्मे, नापेअ, महेश जाधव, अभिषेक शनिवारे, शकील शेख, दिपक मोरे यांनी केली.