नागपूर :- फिर्यादी रौनक लालचंद मोरयानी, वय १९ वर्षे, रा. हेमु कॉलोनी, प्लॉट नं. ५६, जरीपटका, नागपुर यांनी त्यांची होंडा अॅक्टीव्हा मोपेड क. एम.एच. ३१ डि. डब्ल्यू. १७५५ किंमती ४०,०००/- रु. ही पोलीस ठाणे पाचपावली हद्दीत कडबी चौक मेट्रो स्टेशन चे पाौग मध्ये पार्क करून मेट्रोने रायसोनी कॉलेज येथे गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीची नमुद गाडी ठेवलेल्या ठिकाणाहुन चोरून नेली. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे पाचपावली येथे अज्ञात आरोपीविरुध्द कलम ३७९ भा.दं.वी. अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
गुन्हयाचे तपासात पोलीस ठाणे पाचपावली येथील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून व तांत्रीक तपास करून १) विधीसंघर्षग्रस्त बालक हा चोरी गेलेल्या वाहनासह मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, त्याने वर नमुद गुन्हा त्याचा साथीदार पाहीजे आरोपी क. २) मंगेश केदार होले, वय ३० वर्षे, रा. नवा नकाशा, किदवाई ग्राऊंड जवळ, पावपावली, नागपुर ३) विधीसंघर्षग्रस्त बालक याचे सह मिळुन केल्याचे सांगीतले. तसेच, नमुद विधीसंपर्षग्रस्त बालक याचेकडे सखोल चौकशी केली असता, त्याने पोलीस ठाणे पाचपावली हद्दीत नमुद गुन्ह्या व्यतीरीक्त ईतर चार वाहन चोरीचे गुन्हे व पोलीस ठाणे सदर हद्दीतून एक वाहन चोरी केल्याचे सांगीतले. नमुद विधीसंगर्षग्रस्त बालक याचे ताब्यातुन एकुण ८ दुचाकी वाहन किंमती अंदाजे ३,४०,०००/-रू. या मुद्देमाल जप्त करण्यात आला एकुण ६ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले. पुढील तपास सुरू आहे.
वरील कामगिरी पोलीस आयुक्त, नागपुर शहर, सह पोलीस आयुक्त, नागपुर शहर, अपर पोलीस आयुक्त (उत्तर प्रभाग), पोलीस उप आयुक्त (परि. क. ३), मा. सहायक पोलीस आयुक्त (लकडगंज विभाग) यांचे मार्गदर्शनाखाली, पोनि बाबुराव राऊत, सपोनि प्रविण सोमवंशी, पोहवा छगन शिंगणे, पवन भटकर, नापोअं. नितिन वर्मा, प्रकाश राजपल्लीवार, पोअं शहनवाज मिर्झा, ओमप्रकाश बुरडे व पवनसिंग ठाकुर यांनी केली