नागपूर :- पोलीस ठाणे पाचपावली हद्दीत राहणारे फिर्यादी नामे मनोज भानुदास गजभिये, वय ४६ वर्षे, रा. लॉट नं. २२०, बाळाभाऊपेठ, पाचपावली, नागपुर यांनी त्यांची तिन चाकी ई-रिक्षा क्र. एम.एच. ४९ वि.एम ५६१७ किंमती ९०,०००/- रू. ची आपले घरा समोर हँडल लॉक करून व पार्क करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीची ई-रिक्षा चोरून नेली. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे पाचपावली येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०३(२) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाचे तपासात पाचपावली पोलीसांचे तपास पथकाला मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून व तांत्रीक तपास करून, सापळा रचुन आरोपी नामे अॅलेक्स सचिन भोयर, वय १८ वर्षे, रा. म्हाडा कॉलोनी, क्वॉर्टर नं. २४०, पोलीस ठाणे कपिलनगर, नागपुर यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, त्याने वर नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीस अधिक विचारपुस केली असता, त्याने वर नमुद गुन्ह्याव्यत्तिरिक्त पो. ठाणे जरीपटका हद्दीत मोटरसायकल चोरी केल्यांची कबुली दिली. आरोपीचे ताब्यातुन ई-रिक्षा व एक पेंशन प्रो गाडी क. एम.एच ४९ पी ८६८० असा एकुण किंमती अंदाजे १,८५,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपीस अटक करून, पुढील तपास सुरू आहे.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपूर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, प्रमोद शेवाळे अपर पोलीस आयुक्त (उत्तर विभाग) नागपूर शहर, महक स्वामी, पोलीस उप आयुक्त (परि. क. ३), अनिता मोरे, सहा. पोलीस आयुक्त (कोतवाली विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली, पाचपावली पोलीस ठाणे चे वपोनि, बाबुराव राऊत, पोनि. हरीष काळसेकर, पोउपनि, रंजीत माजगावकर, पोहवा, पवन भटकर, राजेश कोकाटे, पोअं. शहनवाज मिर्झा, ओमप्रकाश कुरडे, शंकर आगडे व मनोज चौधरी यांनी केली.