नागपूर :- फिर्यादी तुषार ज्ञानेश्वर इंगोले, वय ३७ वर्ष, रा. घर नं. ८२८, बोरगाव, गोरेवाडा रोड, नागपूर यांनी पो. ठाणे मानकापूर हहीत, तुषार हार्डवेअर दुकानाचे मागे इंगाले लॉनचे बाजुला त्यांची बोलेरो गाडी क. एम. एच ३१ डी. एस ६०१७ ऊभी करून ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे गाडीची एक्साईड कंपनीची बॅटरी किमती अंदाजे १०,०००/- रु ची चोरून नेली. अशा फिर्यादी यांनी दिनांक २५.०२.२०२४ रोजी दिलेल्या तकारीवरून पो. ठाणे मानकापूर येथे अज्ञात आरोपी विरुध्द कलम ३७९ भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंदविला होता. गुन्हयाच्या समांतर तपासादरम्यान मानकापूर पोलीसांचे अधिकारी व अंमलदार यांनी गोपनीय माहिती व तांत्रिक तपास करून पोलीस ठाणे गिट्टीखदान होत गिट्टीखदान चौक, येथे सापळा रचुन आरोपी नामे तेजस उर्फ ओम अंबर रामावत वय २२ वर्ष रा. गंगानगर, झोपडपट्टी, नागपूर यास ताब्यात घेवून विचारापुस केली असता त्याने वर नमूद गुन्हा केल्याचे कबुली दिली. सदर गुन्हयात आरोपीस अटक करून मा. न्यायालयातुन त्याना पि.सी.आर प्राप्त करून त्याचेकडे अधिक विचारपूस केली असता, त्याने पोलीस ठाणे गिट्टीखदान येथील वाहन चोरी, पोलीस ठाणे सदर येथील तिन वाहन चोरीचे गुन्हे, पोलीस ठाणे हुडकेश्वर येथील एक वाहन चोरीचा गुन्हा केल्याचे कबुल केले. आरोपीचे ताब्यातून तिन बॅटरी, १) पेंशन प्रो गाड़ी क. एम.एव. ४९ के ७३१५, २) लेझर गाडी क. एम.एव. ३१ हैं. व्ही ७०६७, ३) पेंशन प्रो गाडी क्र. एम. एच. ४९ ए.जी १३६२, ४) हिरो होन्डा स्प्लेंडर गाडी क. एम. एच. ३१ ई.डी ५५७१, ५) हिरो होन्डा स्प्लेंडर गाडी बिना नंबर प्लेट असलेली, असा एकुण ३,००,५००/- रू या मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास सुरू आहे.
वरील कामगिरी अपर पोलीस आयुक्त साहेव, पोलीस उपआयुक्त (परि क. २), सहा. पोलीस आयुक्त, सदर विभाग, यांचे मार्गदर्शनात वपोनि राजश्री आडे, सपोनि विलास पाटील, पोहवा राजेश बरणे, नापोडं राहुल गवई, पोअं, विपीन रखे, मिलीट नासरे, प्रशांत खंडारे, कैलास मुळे, विक्रमसिंग ठाकुर यांनी केली.