नागपूर :- पोलीस ठाणे अजनी हद्दीत विश्वकर्मा नगर, गल्ली नं. १. भिमोदय मंडळ, बुध्द विहार, एन. आय. टी गार्डन जवळ, अजनी, नागपूर येथे राहणारे फिर्यादी भदंत कौवडीन्य वय ५७ वर्ष, यांनी त्यांचे रूम मध्ये मोबाईल फोन चार्जीग करीता लावुन दार लोटुन बुध्द विहारा मध्ये प्रबोधन करण्याकरीता गेले असता, एका संशयीत २१ वर्षीय मुलाने फिर्यादीचे रूम मधुन फिर्यादीचा मोबाईल फोन सॅमसंग गॅलेक्सी एम २१ किंमती १२,०००/- रू चा चोरून नेला. अशा फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे अजनी येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०५ (अ) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाख करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे तपासात अजनी पोलीसांना मिळालेले माहिती वरून व तांत्रीक तपास करून आरोपी नामे सौरभ नत्थूजी गावंडे, वय २१ वर्ष, रा. रामचाग, जयंती मैदान, ईमामवाडा, नागपूर यास ताब्यात घेवुन विचारपूस केली असता त्याने सदर गुन्हा केल्याचे कबुल केले, आरोपीचे ताब्यातुन फिर्यादीचा मोबाईल फोन किंमती १२,०००/- रू. या जप्त करण्यात आला आहे. आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
वरील कामगिरी पोलीस उप आयुक्त (परि, क. ४), सहा. पोलीस आयुक्त (अजनी विभाग) यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि. नितीनचंद्र राजकुमार, पोनि. गुन्हे लक्ष्मण केन्द्रे, पोउपनि, अंकीत अंबेपवार, पोहवा. ओमकार वारभाई, पोअं. नितीन सोमकुंवर, अश्विन सहारे, नरेश श्रावणकर, दादाजी मामेडवार, सुखचरण उईके यांनी केली.