नागपूर :- पोलीस ठाणे सदर हद्दीत पुनम सुपर बाजार, वैरामजी टाउन, सदर, नागपुर येथुन अज्ञात आरोपीने बाजाराचे मागील भिंतीला लागलेले ४ एसी ने कॉपर पाईप, कॉम्प्रेसर, वायर व जाळी असा एकुण अंदाजे किंमती ६०,०००/- रू मुद्देमाल चोरून नेला. फिर्यादी दिनेश वंशगोपाल चतुर्वेदी वय ४८ वर्ष रा. सुरेन्द्रगढ़, पांडे किराणा जवळ, गिट्टीखदान, नागपूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे सदर येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३७९ भा.दं.वी अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हेशाखा, युनिट क. ०३ येथील अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून आरोपी १) योगेश धनराज झाडे वय २५ वर्ष २) अमोल भिमराव सहारे वय २९ वर्ष दोन्ही रा. नंदनवन झोपडपट्टी, गल्ली नं. ९. व १०, पोलीस ठाणे नंदनवन, नागपूर यांना ताब्यात घेवुन विचारपूस केली असता आरोपींनी वर नमुद चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींना गुन्हयात अटक करण्यात आली आहे. आरोपींना पुढील तपासकामी सदर पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.
वरील गुन्हा उघडकीस आणण्याची कामगिरी पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), सहायक पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) यांचे मार्गदर्शनाखाली पोनि, मुकुंद ठाकरे व पथकातील अंमलदार यांनी केली.