वेलतुर :- अंतर्गत मौजा देवळी कला १८ कि.मी. पश्चिम येथे यातील फिर्यादी हे महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनी मर्यादीत मांढळ ग्रामिण विज वितरण केंद्र येथे सहायक अभियंता या पदावर कार्यरत असून, त्यांच्याकडे मांढळ ग्रामिण भागाचे विद्युत वितरणाचे काम असून गावोगावी महाराष्ट्र राज्य वितरण च्या विद्युत वाहिण्या आहेत. दिनांक ०३/०४/२३ चे ०७/०० ते १४/०४/२३ चे ००/०० वा.. दरम्यान, यातील नमूद आरोपीतांनी संगणमत करून नागी भोयर यांचे शेतातील आणि लगतचे शेतातील कृषी पंपाच्या लाईनचे पोल तोडून त्यावरील ॲल्युमिनियम १४ स्पॅनचे तार कापून अंदाजे ३.५ कि.मी./ ४९० की. ग्रॅम ॲल्युमिनियम तार अंदाजे किं ९०,०००/-रु. माल चोरुन नेला व नादुरुस्त १०० के. की. ए. क्षमतेचा ट्रांसफार्मर कि अंदाजे ८०,०००/-रु. चा माल चोरून घेवून जाण्याचा प्रयत्न केला.
सदर प्रकरणी फिर्यादी नामे प्रितीश भगवान वंजारी, वय ३५ वर्ष, रा. नवेगाव रोड मांढळ, ता. कूही, मो. नं. ७८७५०२७०२९ यांचे रिपोर्टवरून पो.स्टे. वेलतुर येथे आरोपी नामे- १. करण महेश शाहु, वय अंदाजे १९ वर्ष, २. रंजीत अच्छेलाल शाहु वय अंदाजे २५ वर्ष, ३. सुरन लवलेश शाहु, वय अंदाजे २९ वर्ष, ४. अंकीत मेश्राम शाहु, वय अंदाजे ३१ वर्ष, सर्व रा. गौरीशंकर नगर, कळमना, नागपूर यांचेविरोधात आरोपीविरुद्ध कलम ३७९, ५११, ३४ भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास – सफी / २१०, संजय पायक, पो.स्टे. बेलतूर मो.नं.८८३०९२३३१० हे करीत आहे..