भिवापूर :- पोलीस भिवापूर येथील स्टाफ पोलीस स्टेशन भिवापूर हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, भुटानबोरी शिवार भिवापुर येथे ०५ टिप्पर वाहनाद्वारे अवैधरीत्या रेतीची चोरटी वाहतुक होत आहे. अशा मिळालेल्या विश्वसनिय माहिती वरून नमुद घटनास्थळी नाकाबंदी केली असता स्टाफसह भुटानबोरी शिवार भिवापुर येथे १) दस चक्का ट्रक टिप्पर कं. २ एम एच ४९ ए.टी ७२२२ या चालक आरोपी नामे- १) मोहम्मद मिन्हाज खान वय ३२ वर्ष रा. गरीब नवाज चौक खरबी नागपुर याने आपल्या ताब्यातील वाहनात ६ ब्रास रेती अंदाजे कि, ५००० रू. प्रमाणे ३०,००० रू (२) तसेच दस चक्का ट्रक टिप्पर कं. एम एच ४९ ए.टी ८०१२ चा चालक आरोपी मोहम्मद इसराइल अकबर खाँन वय ३२ वर्ष रा. साईबाबा नगर खरबी नागपुर थाने आपल्या ताब्यातील वाहनात ०६ ब्रास रेती अंदाजे कि. ५००० रू. प्रमाणे ३०,०००रू (३) दस चक्का व्रक टिप्पर कं. एम एच ३३. टी २३३३ चा चालक आरोपी नामे सचिन अण्णाजी मांडवकर वय ४० वर्ष रा प्लॉट क ७१ साईवावा नगर खरवी नागपुर याने आपल्या ताब्यातील वाहनात ०६ ब्रास रेती अंदाजे कि.५००० रू. प्रमाणे ३०,०००रु (४) वारा चक्का ढंक टिप्पर के. एम एच ४० सी टी ७२२२ मा चालक आरोपी मोईन जलील खाँन वय २५ वर्ष रा खरवी नागपुर याने आपल्या ताब्यातील वाहनात ८ ब्रास रेती अंदाजे कि, ५००० रू. प्रमाणे ४०,०००रू. तसेच ५) द्रक टिप्पर क एम.एच-४९-ए.टी. ५०२८ चा चालक आरोपी नामे मोहम्मद सकलैन/नवाजुद्दीन खान वय २२ वर्ष रा. तापेज ठाणा चतरा झारखंड ह.मु. खरवी नागपुर याचे ताब्यातून १० चक्का टिप्पर क एम.एच-४९-ए.टी. ५०२८ मध्ये ०५ ग्रास रेती ५०००/- रू. ब्रास प्रमाणे २५००० एकुण किंमती १५२५०००/रू. असा एकुण ०५ ट्रक टिप्पर मध्ये ३१ ब्रास रेती किंमती १५५०००/-रु. ०५ टिप्पर किमती ८,००००००/-रू. असा एकुण ८१,५५,०००/-रू. चा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त करण्यात आला. आरोपी क्र. ०१ ते ०५ यांना अटक करण्यात आली. अवैद्यरित्या विनापरवाना शासनाचा महसूल वूडवून रेती भरून सार्वजनीक मालमत्तेचे नुकसान करून रेतीची चोरटी वाहतूक करतांना मिळून आल्याने आरोपीतांविरूद्ध कलम ३०३(२), ४९, ३(५), ४८(७), ४८(८) महा. जमिन महसुल संहिता १९६६. सह. कलम ४, २१ खानी, आणी खनिजे (विकास आणी नियमन) अधि. १९५७ स.क ३ सार्व. मालमत्ता नूकसान प्रति. अधि.१९८४ अन्वये गुन्हे नोंद करण्यात आलेला असुन पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनात पोस्टे भिवापूर येथील ठाणेदार सपोनि जयप्रकाश निर्मल, सफौ किशोर ठाकुर, पाहवा राकेश त्रिपाठी, पोअं. प्रितम खोपे त्यांचा स्टाफ यांनी पार पाडली.