नागपूर :- पोलीस ठाणे वाठोडा हद्दीत राहणारी २० वर्षीय फिर्यादी मुलगी ही तिचे कॉलेज मधुन ऑटो रिक्षाने घरी जात असता पोलीस ठाणे अजनी हद्दीत लोकमान्य नगर, हिंगणा रोड ते मानेवाडा चौक दरम्यान बसलेला सहप्रवासी आरोपी नामे कुणाल अनिल लौंदे वय ३२ वर्षे, रा. विद्या नगर, नंदनवन, नागपूर याने या पुर्वी तसेच घटनेवेळी फिर्यादी सोबत अॅटो मध्ये बसुन तिचे सोबत अश्लिल चाळे करून तिचे मनास लज्जा येईल असे कृत्य करून फिर्यादीचा विनयभंग केला.
याप्रकरणी फिर्यादी हिने दि. २९.०३.२०२४ रोजी दिलेल्या तकारीवरून पोलीस ठाणे अजनी येथे पोउपनि, मस्को यांनी आरोपीविरूध्द कलम ३५४, ३५४(अ), ३५४(ड) भा.द.वि. कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.