कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तरेस एक किमी अंतरावर आंबेडकर चौक कन्हान येथे दोन आरोपी अवैधरित्या धारदार व घातक शस्त्र बागळतांनी मिळुन आल्याने कन्हान पोलीसांनी दोन्ही आरोपी ला अटक करून त्यांच्या जवळुन दोन चाकु किंमत ६०० रूपया चा मुद्देमाल जप्त करित ही कारवाई करण्यात आली.
प्राप्त माहिती नुसार बुधवार (दि.८) जुन ला रात्री ११.२० ते ११.४५ वाजता दरम्यान पोशि विशाल शंभरकर, पोशि सम्राट, नापोशि राहुल रंगारी हे पोलीस स्टेशन परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना तारसा रोड चौक येथे हजर असतांना गुप्त बातमी माहिती मिळा ली की, नगरपरिषद कन्हान कडुन एका काळ्या रंगा च्या शर्ट घातलेला इसम व एक चौकलेटी रंगाचा शर्ट घातलेला इसम हे आपल्या कंबरेत चाकु ठेऊन आंबे डकर चौक कन्हान कडे जात आहे. अश्या माहीती वरून पोलीसांनी आंबेडकर चौक येथे आले व तेथे असलेले दोन पंचाना जवळ बोलावुन त्यांना सदर का ळ्या रंगाच्या शर्ट घातलेला इसम व चौकलेटी रंगाचा शर्ट घातलेला इसमा बद्दल माहिती दिली व या इसमा वर कार्यवाही करते वेळी सोबत राहण्याबाबत सहमती दिल्याने त्यांना कलम १६० जाफौ प्रमाणे समन्स तामिल करण्यात आले. सदर दोन्ही इसम हे आंबेडकर चौक येथे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा मनात भीती निर्माण होईल. त्याचे कंबरे मधील शस्त्र लोकांना दिसे ल या प्रमाणे ते तेथे फिरत असतांना दिसल्याने पोली सांनी पंचा समक्ष त्यांना थांबवुन त्यांचे नाव गाव विचा रले असता त्यांनी त्याचे नाव १) सोनु श्यामलाल गुप्ता वय १९ वर्ष राह. हरीहरनगर कांद्री २) बादल श्रीकृष्ण उईके वय २३ वर्ष राह. रायनगर कन्हान असे सांगित ले. त्यांची पंचासमक्ष अंगाची झडती घेतली असता त्या दोन्ही इसमांचा कंबरेत स्टील पात्याचे दोन चाकु मिळुन आल्याने पंचासमक्ष त्या दोघांना व दोन्ही चाकु ची किंमत ६०० रूपये चा मुद्देमाल ताब्यात घेऊन घट नास्ळाचा जप्ती पंचनामा नापोशि राहुल रंगारी यांनी पंचासमक्ष मौक्यावर बनविला. सदर प्रकरणात कन्हा न पोलीसांनी सरकार तर्फे पोशि विशाल शंभरकर च्या तक्रारी वरून दोन्ही आरोपी विरुद्ध कलम ४, २५, भा .ह.का, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यां च्या मार्गदर्शनात पोलीस सहायक फौजदार गणेश पाल हे पुढील तपास करीत आहे.