– पोलीस स्टेशन भिवापूरची कार्यवाही
भिवापूर :- पोलीस स्टेशन भिवापूर येथील स्टाफ पोस्टे हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय बातमी कडून माहिती मिळाली की पवनी कडून उमरेड कडे एक एल.पी ट्रक टिपर क्रमांक MH-40 CM- 7864 विनापरवाना अवैधरेता रेतीची चोरटी वाहतूक करताना जात आहे अशा खबरे वरून स्टाफ यांनी नक्षी शिवारात प्रभावी नाकाबंदी लावून एल पी ट्रक व एल पी ट्रक मध्ये भरून असलेली १२ ब्रास रेती किंमत अंदाजे ६००००/- व एल.पी ट्रक क्रमांक MH-40 CM-7864 किमती ३००००००/- लाख असा एकूण ३०६००००/- रुपयाचा माल आरोपी नामे मोसिन अहमद खान मंजूर अहमद खान वय ३१ वर्ष रा. वलगाव रोड अमरावती २) राजेश कुवरलाल कवडेटी व ३१ वर्ष राहणार गोरेगाव तालुका वरुड जिल्हा अमरावती यांच्या ताब्यातून जप्त करून पोलीस स्टेशन भिवापूर येथे क्रमांक ३३२/२०२४ कलम ३०३ (२),४९,३(५) BNS. सह कलम ४८(८) (७) जमीन महसूल अधिनियम १९६६ सह कलम ४,२१ खाणी आणि खनिजे अधिनियम १९५७ सहकलम ३ सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोहवा ३८४ मधुकर सुरपाम हे करीत आहेत.
सदरची कार्यवाही ही हर्ष पोद्दार पोलीस अधिक्षक नागपुर (ग्रा.), रमेश धुमाळ अपर पोलीस अधिक्षक नागपुर (ग्रा) यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे भिवापूर येथील ठाणेदार जयप्रकाश निर्मल, रवींद्र जाधव, निकेश आरीकर, मनोज चाचेरे, दीपक ढोले यांचे पथकाने पार पाडली.