नागपूर :- फिर्यादी संजीव केवलराव भारसागडे वय ५३ वर्ष रा. कुंभार टोळी, नंदनवन, नागपूर हे एन.एम.सी नेहरू नगर झोन येथे सफाई कामगार असल्याने, ते पोलीस ठाणे सक्करदरा हद्दीत शितला माता मंदीर समोरून आपले कर्तव्यावर जात असता त्यांच्या ओळखीच्या ज्योती अनुवठे हया भेटल्या व त्यांनी पतीला फोन करायचा आहे तुमचा फोन दया असे म्हणून फिर्यादीचे फोनवरून कॉल डायल करून फोनवर बोलत असता, एक अनोळखी ईसम येवुन त्याने ज्योती अनुवठे यांचे कानाला लागलेला मोबाईल हिसकावुन घेवुन पळुन गेला. अशा फिर्यादी यांनी दिलेल्या रिपोर्टवरून पोलीस ठाणे सक्करदरा येथे अनोळखी आरोपीविरूध्द कलम ३०४ भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हेशाखा युनिट क्र. ४ चे अधिकारी व अंमलदार यांना विनतारी संदेश विभाग मार्फतीने मिळालेल्या गुन्हयाचे माहितीवरून त्यांनी वेळीच दखल घेवुन घटनास्थळाची पाहणी करून व फिर्यादी यांनी दिलेल्या वर्णनावरून गुप्त बातमीदारा मार्फतीने व तांत्रीक तपास करून आरोपी सय्यद राशीद सय्यद नूर वय २५ वर्ष रा. पठाण चौक, नागपुरी गेट, अमरावती यास त्वरीत ताब्यात घेवुन विचारपूस केली असता, त्याने स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता वर नमुद गुन्हा केल्याचे कबुल केले. आरोपीचे ताब्यातुन एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन किंमती अंदाजे १५,०००/-रू, या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीचा अभिलेख तपासला असता तो वाहन चोरी व चोरीचा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरूध्द पोलीस ठाणे सिटी कोतवाली जि. अमरावती येथे गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली. आरोपीस अटक करून, मुद्देमालासह पुढील कार्यवाहीस्तव सक्करदरा पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपुर शहर, अश्वती दोरजे, सह पोलीस आयुक्त नागपुर शहर, संजय पाटील, अपर पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) नागपुर शहर, राहुल माकणीकर, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), अभिजीत पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हेशाखा युनिट क. ४ चे पोनि. रमेश ताले, व त्यांचे पथकाने केली.