नागपूर :- फिर्यादी अलका सुरेंद्र सांगोळे, वय ४२ वर्षे, रा. सिध्दार्थ नगर, टेका, पाचपावली, नागपूर ह्या दिनांक १७.११.२०२३ मे २०.१५ वा. चे सुमारास, ड्युटी संपवुन पोलीस ठाणे पाचपावली हद्दीतुन गंदुर रेस्टॉरंट च्या मागील गल्लीतुन पायदळ घरी परत जात असतांना, दोन अनोळखी इसम एका दुचाकी गाडीवर फिर्यादीचे माघुन येवून फिर्यादीचे गळ्यातील हॅन्डबॅग जबरीने हिसकावून घेवून गेले नमुद बॅगमध्ये फिर्यादीचे दोन मोबाईल, ए.टी.एम. कार्ड, बँकेचे पासबुक, आधार, वोटींग कार्ड, घराच्या व हॉस्पीटलच्या चाब्या तसेच, नगदी ७००/-रु. असा एकुण ३०,७००/-रु. चा मुद्देमाल होता फिर्यादीचा नमुद मुद्देमाल दुचाकीवरील आलेल्या आरोपींनी जबरीने हिसकावुन घेवुन पळुन गेले. अशा फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो. ठाणे पाचपावली येथे अज्ञात आरोपी विरुध्द कलम ३९२, ३४ भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाच्या समांतर तपासादरम्यान, गुन्हे शाखा, यूनिट क. ३ वे अधिकारी व अंमलदार यांनी गोपनीय माहितीवरून व तांत्रिक तपास करून आरोपींना निष्पन्न केले आरोपी क. १) आकाश निवृत्ती चंदनखेडे, वय ३० वर्षे, २) अश्वीन बामनराव माहुरे, वय ३६ वर्षे, दोघेही रा. गल्ली क. ११, न्यु इंदोरा, जरीपटका, नागपूर यांना ताब्यात घेवुन विचारापुस केली असता, त्यांनी वर नमूद गुन्हा केल्याने कबुल केले. आरोपीचे ताब्यातुन गुन्हयातील दोन गोबाईल फोन व गुन्हयात वापरलेली स्प्लेंडर दुचाकी गाडी क. एम. एच. ३१ एस. आर. ५५८३ असा एकुण किंमती अंदाजे १,२०,०००/- रु. चा मुद्देमाल जप्त करून, दोन्ही आरोपिना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे. वरील कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनात, पोनि मुकुंद ठाकरे, सपोनि समाधान बजबळकर, पोउपनि मधुकर काठोके,सफी. सतिश पांडे, दशरच मिश्रा, पोहवा विजय श्रीवास, संतोषसिंग ठाकुर, पोअं जितेश रेड्डी, दिपक दासरवार, विशाल रोकडे, प्रमोद देशभ्रतार व दिपक लाकडे यांनी केली,