नागपूर :- कळमणा पोलीस ठाणे चे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहीती वरून जानकी नगर, माता मंदीरचे बाजुला स्टील कारखान्ऱ्या जवळ सार्वजनिक ठिकानी एका संशयीत ईसमास ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव ओमप्रकाश उर्फ झाऊ पुनव लहरे वय २२ वर्ष दोन्ही रा. मिनीमाता नगर, पाच झोपडा, कळमणा, नागपूर असे सांगीतले, त्यांची अंगझडती घेतली असता, त्याचे जवळ एक लोखंडी चाकु किंमती अंदाजे ५००/- रू. चा मिळाल्याने तो जप्त करण्यात आला. आरोपी हा घातक शस्त्र बाळगतांना समक्ष मिळुन आल्याने व त्याने मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याने, पोलीस ठाणे कळमणा येथे पोउपनि, राऊत यांनी आरोपीविरूध्द कलम ४/२५ भा.ह.का., सहकलम १२२, १३५ म.पो.का. अन्वये गुन्हा दाखल करून, आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.