नागपूर :- पोलीस ठाणे सिताबर्डी हद्दीत, आनंद नगर, डॉ. बाबासाहेव पुतळया जवळ, नागपूर येथे राहणाऱ्या फिर्यादी कांचन अर्जुन वराडे, वय ४५ वर्षे, हया आपले राहते घराला कुलूप लावुन त्यांचे भावाकडे मनिष नगर येथे गेल्या असता अज्ञात चोरट्याने घराचे दाराचे कुलूप तोडुन घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने व रोख १०,०००/- रू असा एकूण ४०,०००/- या मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे सिताबर्डी येथे अज्ञात आरोपी विरूध्द कलम ४५४, ४५७, ३८० भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
गुन्हयाचे तपासादरम्यान पोलीस ठाणे सिताबर्डी ने अधिकारी व अंमलदार यांनी खात्रीशीर गोपनीय माहिती काढून व तांत्रिक तपास करून, आरोपी नामे सुरज सिध्दार्थ सोमकुवर, वय २७ वर्ष, रा. ए/१६५, लुबीनी नगर, ड्रॅगन पॅलेस मागे, नविन कामठी, नागपूर यास ताब्यात घेवुन विचारापुस केली असता, त्याने वर नमूद गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीस नमुद गुन्हयात अटक करून पोलीस कोठडी प्राप्त करण्यात आली. आरोपीस अधिक सखोल विचारपूस केली असता, आरोपीने या गुन्हयाव्यतीरिक्त पोलीस ठाणे सिताबर्डी हद्दीत ईतर तिन वेगवेगळया ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली. आरोपीचे ताब्यातुन सोन्याचे दागिने व चोरीचे पैश्यातुन खरेदी केलेले एकुण ०९ मोवाईल व इतर सामान असा एकुण किंमती अंदाजे २,३५,४७३/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी कडुन पोलीस ठाणे सिताबर्डी येथील घरफोडीचे एकुण चार गुन्हे उघडकीस आणन्यात आले.
वरील कामगिरी पोलीस उपआयुक्त (परि क. २), सहा. पोलीस आयुक्त, सिताबर्डी विभाग यांचे मार्गदर्शनात, वपोनि आसाराम बोरमले, सपोनि संतोष कदम, पोहवा चंद्रशेख गौतम, संदीप भोखरे, पोअं. शत्रुघ्न मुंडे, प्रशांत भोयर, विक्रमसिंग ठाकुर यांनी केली.