– गुन्हे शाखा, घरफोडी विरोधी पथक व वाहन चोरी विरोधी पथक, पोलीसांची कामगीरी
नागपूर :- पोलीस ठाणे वाठोडा हद्दीत, श्री स्टार हाऊसिंग सोसायटी, चैतन्यनेश्वर नगर, वाठोडा, नागपूर येथे राहणाऱ्या फिर्यादी प्रियंका आशिष जांगडे, वय ३१ वर्षे, हया आपले घराचे मुख्य दाराला कुलूप लावुन कुटंबासह बाहेर गेल्या असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे घराचे दाराचे लॉक तोडुन, घरात प्रवेश करून, घरातील लोखंडी आलमारीतील सोन्याचे दागिने एकुण किमती ४,२३,०००/-रु. चा मुद्देमाल चोरून नेला. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो. ठाणे वाठोडा येथे अज्ञात आरोपी विरूध्द कलम ४५७, ४५७, ३८० भादवि, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हेशाखा पोलीसांचे अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून पाळत ठेवुन, सापळा रचुन गुन्हयातील आरोपी नामे संदीप खेमचंद्र टेंभरे वय २४ वर्ष रा. हुंडा, शिवनी, मध्य प्रदेश यास ताब्यात घेतले. त्याची सखोल विचारपूस केली असता आरोपीने वर नमूद घरफोडी केल्याची कबुली दिली.
तसेच आरोपीने पोलीस ठाणे वाठोडा हद्दीत दिनांक ०१.०१. २०२४ रोजी जिजामाता नगर, प्लॉट नं. १५१, येथे राहणारे फिर्यादी संजय महादेवराव नाकाडे वय ४४ वर्ग यांचे राहते घरी घरफोडी केल्याची कबुली दिली. तसेच आरोपीने पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीत घरफोडी केल्याची कबुली दिली, आरोपीने गुन्हयात चोरी केलेला मुरेमाल सोन्याचे दागिने, पाहिजे आरोपी क. १) ओम शर्मा रा. शिवाजी नगर, गंगाबाई घाट, कोतवाली, नागपूर याचे मार्फतीने पाहिजे आरोपी क. २) तुवर कावडे रा. लालगंज, शांतीनगर, नागपूर यास विकी केल्याचे सांगीतले, आरोपीने दागिने विक्री करून मिळालेल्या रकमेतुन होन्डा कंपनीची, केटा कार क. एम. एच ३१ ई.यू. ७३६८ किमती ६,५०,०००/- ची खरेदी केल्याची कबुली दिली, आरोपीस गुन्हयात अटक करण्यात आली असून त्याचे ताब्यातुन केटा कार एकुण ६,५०,०००/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. पाहिजे आरोपींचा शोध सुरू आहे. गुन्हेशाखा पोलीसांनी घरफोडीचे तिन गुन्हे उघडकीस आणलेले आहे. आरोपीस मुद्देमालासह पुढील तपासकामी वाठोडा पोलीसांचे ताब्यात दिलेले आहे.
वरील कारवाई पोलीस उपायुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, घरफोडी विरोधी पथक व वाहन चोरी विरोधी पथक चे अधिकारी व अंमलदार यांनी केली.