घरफोडी करणाऱ्या आरोपींना अटक

नागपूर :- पोलीस ठाणे गिट्टीखदान हद्दीत, प्लॉट नं. ५७२/ई, सुरेन्द्रगढ़, चौरसिया हॉस्पीटल जवळ, नागपुर येथे राहणारे फिर्यादी दिलीप माहनलाल ओझा, वय ५४ वर्षे, यांनी त्यांचे घरा समोर असलेली दुध डेअरी बंद करून घरी गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे डेअरीचे मागील दार उघडुन आत प्रवेश करून दुकानातील चॉकलेटचे पॅकेटस व लोणच्याची बरण्या व डाव्हर मधील रोख १३,०००/- रू. असा एकूण १९,०००/- रू चा मुद्देमाल चोरून नेला.

फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे गिट्टीखदान येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०५(अ), ३३१ भा. न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हयाचे तपासात गिट्टीखदान पोलीसांनी तांत्रीक तपास करून सापळा रचुन आरोपी अभिषेक प्रेमानंद इंदुरकर वय २३ वर्षे, रा. आझाद नगर, पोलीस ठाणे गिट्टीखदान यास ताब्यात घेवुन विचारपूस केली असता आरोपीने नमुद चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीचे ताब्यातुन चॉकलेटचे पॉकीटे व रोख असा ३०,०१०/-रू. चा मुद्देमाल जप्त करून त्यास गुन्हयात अटक केली आहे. तपासादरम्यान आरोपीने वरील गुन्हयाव्यतीरिक्त पोलीस ठाणे गिट्टीखदान हद्दीत दोन घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. तसेच पोलीसांनी पेट्रोलींग दरम्यान वाहन चोरी करणारा आरोपी नामे नितेश अशोक गिरावकर वय २३ वर्ष रा. आखरी बस स्टॉप, वडार मोहल्ला गिट्टीखदान यास ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातून गुन्हयात चोरी केलेली अॅक्टीव्हा मोपेड क्र. एम.एच ३१ एफ.डी १८५९ किंमती २०,०००/- रू ची जप्त केलेली आहे.

वरील कामगिरी पोलीस उप आयुक्त (परि. क. २), मा. सहा. पोलीस आयुक्त (सदर विभाग) यांचे मार्गदर्शनाखाली, वपोनि, कैलास देशमाने, पोहवा. बलजीत ठाकुर यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

चौराई ४ , तोतलाडोह १४, पेंच नवेगांव खैरी धरणाचे १६ दरवाजे उघडले

Mon Jul 29 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – पेंच व कन्हान नदी पाण्याची पातळी वाढली, नदी काठावरील नागरिकांना सर्तकतेचा ईशारा.  – एन.एस सावरकर आणि अजय शेलार यांचे नागरिकांना आवागन कन्हान :- मध्यप्रदेशातील येथील चौराई धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर त्याचे ४ दरवाजे उघडुन पाणी सोडण्यात आले. त्यामुळे तोतलाडोह आणि पेंच धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने दोन्ही धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने कन्हान नदीच्या पाण्याची पातळीत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com