घरफोडी व वाहन चोरी करणाऱ्या आरोपीस अटक, ०२ गुन्हे उघडकीस 

नागपूर :- पोलीस ठाणे गणेशपेठ हदीत घर नं. ६१२, जोशी भवन, घाट रोड, नागपूर येथे राहणारे फिर्यादी संजय उर्फ गोपाल सत्यनारायण जोशी वय ६२ वर्ष हे आपले राहते पराला कुलूप लावुन परिवारासह इंदोरा येथे नातेवाईकाचे लग्नाला गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे मुख्य दाराचे कुलूप तोडुन घरात प्रवेश करून बेडरूम मधील लोखंडी आलमारी ठेवलेले अमेरीकन डॉलर, दुबई व सिंगापूर करंसी, सोन्या-चांदीचे दागिने व नगदी ५०,०००/- रू असा एकुण ७,९९,५००/- रू या मुद्देमाल चोरून नेला. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे गणेशपेठ येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३३१(४), ३०५ भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हेशाखा युनिट क. ३ चे अधिकारी व अंमलदार यांना गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहीतीवरून तसेच, तांत्रीक तपास करून आरोपी १) शाहरूख खान वल्द हनीफ खान, वय २३ वर्षे, रा. ज्योती नगर, खदान, तहसिल, नागपूर, ह.मु फ्लॅट नं. ४०३, राय आशियाना अपार्टमेंट, बिल्डींग नं. ४. लांजेवार यांचे घरी किरायाने, मानकापूर, नागपूर यास ताब्यात घेवुन विचारपूस केली असता, त्याने वर नमुद गुन्हा त्यांचे साथिदार पाहिजे आरोपी २) क्षितीज चौकसे रा. बुध्दनगर, पाचपापली, नागपूर ३) एक विधीसंघर्षग्रस्त बालक रा. तहसिल, नागपूर यांचे सोबत संगणमत करून केल्याची कबुली दिली. आरोपीस अधिक सखोल विचारपूस केली असता, त्यांनी वरील गुन्ह्याव्यतीरीक्त पोलीस ठाणे नविन कामठी हद्दीत वाहन चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीस नमुद गुन्हयात अटक करण्यात आली आहे. आरोपीचे ताब्यातून अमेरीकन करंसी, दुबई, मलेशीया, सिंगापूर ची करंसी, वेगवेगळया देशाचे करंसीचे सिक्के, तसेच पोलीस ठाणे नविन कामठी हद्दीतुन चोरी केलेली अॅक्टीव्हा गाडी क. एम. एच ४० ए शेड ३२७९ सोन्याची चैन व मोत्याची माळ असा एकुण किंमती अंदाजे ३.२६,२२५/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपीकडुन एकुण दोन गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहे. पाहिजे आरोपीचा शोध सुरू आहे.

वरील कामगिरी पोलीस आयुक्त नागपूर शहर, सह पोलीस आयुक्त नागपूर शहर, अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, पोनि. मुकुंद ठाकरे, पोउपनि, नवनाथ देवकाते, सफी, ईश्वर खोरडे, मिलींद चौधरी, पोहवा, मुकेश राऊत, प्रविण लांडे, अमोल जासुद, विनोद गायकवाड, नापोअं. अनुप तायवाडे, संतोष चौधरी, पोअं. प्रविण रामटेके, अनिल बोटरे यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वाहन चोरी करणाऱ्या आरोपीस अटक, ०३ गुन्हे उघडकीस

Wed Jul 31 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे अजनी हद्दीत, नाईक नगर, संजय बांगडेचे घरा समोर, फिर्यादी शेख रमजान शेख मजीद पठाण वय ५५ वर्षे, ग. प्लॉट नं. ३५, बेसा ग्रामपंचायत जवळ, बेलतरोडी, नागपूर यांनी त्यांची हिरो होन्डा स्प्लेंडर मोटरसायकल क. एम.एच ३१ ए.एस ६४५१ किंमत्ती २०,०००/- रू ची, लॉक करून पार्क करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे वाहन चोरून नेले. फिर्यादी यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com