मोबाईल दुकान फोडणाऱ्या व चोरी करणाऱ्या आरोपींना मुद्देमालासह – अटक

नागपूर :-अ) पोलीस ठाणे हुडकेश्वर हदीत फिर्यादी अश्वीन सुनिल वाघमारे, वय ३५ वर्ष, रा. प्लॉट नं. २९८, जवाहर नगर, मानेवाडा रोड, सिध्देश्वरी हॉलचे समोर, हुडकेश्वर येथे राहत असून, तेथेच त्यांची मोबाईल शॉपी आहे. फिर्यादी हे रात्री आपले मोबाईल शॉपी बंद करून, कुलुप लावुन घरी गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे दुकानाचे शटरचे लॉक तोडुन दुकानात प्रवेश करून दुकानातील विविध कंपनीचे एकूण २४ मोबाईल किंमती अंदाजे २,५५,४०७/-रू मुद्देमाल चोरून नेला. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो. ठाणे हुडकेश्वर येथे अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ४५४, ४५७, ३८०, भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हयाचे समांतर तपासात हुडकेश्वर पोलीस ठाणेचे अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या खात्रीशिर माहीतीवरून व तांत्रीक तपासावरून सापळा रचुन आरोपी क. १) शेख आरीफ शेख शाकीर वय २३ वर्ष, रा. ठाकुर प्लॉट, मोठा ताजबाग, नागपूर यास ताब्यात घेवुन विचारपूस केली असता त्याने सदर गुन्हा त्याचे मित्र आरोपी क. २) पियूष पंजक कांबळे वय १९ वर्ष, रा. कैलास नगर, नागपूर ३) रजत आनंद गोडाने वय १९ वर्ष, ग. सावित्रीबाई फुले नगर, नागपूर व त्यांचा साथिदार विधीसंघर्षग्रस्त बालक यांचे सह केल्याची कबुली दिली व चोरी केलेले मोबाईल पैकी दोन मोबाईल आरोपी क. ४) मोहम्मद तौसीफ मोहम्मद वहीद छव्वारे वय २४ वर्ष रा. बाबा ताज हॉटेल मागे, खरबी नागपूर यास विक्री केल्याचे सांगीतले. आरोपी कडुन गुन्हयातील चोरी गेलेले वेगवेगळ्या कंपनीचे एकूण २३ मोबाईल, एक कॉलेज बॅग व एक तिन चाकी अँटो असा एकूण ३,५५,१३३/- रूचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विभागीय लोकशाही दिनात तीन तक्रारी प्राप्त

Mon Jul 10 , 2023
नागपूर :-  विभागीय लोकशाही दिनात आज नव्याने प्राप्त तीन तक्रार अर्ज व प्रलंबित तीन अशा एकूण सहा प्रकरणांवर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली आज सुनावणी पार पडली. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित विभागीय लोकशाही दिनात बिदरी यांनी तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेतले व प्राप्त तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. उपायुक्त घनश्याम भूगावकर, अपर पोलीस अधीक्षक संदिप पखाले, नायब […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com