संदीप कांबळे, कामठी
महाराष्ट्र पोलीस बाईज संघटन पारशिवनी व्दारे कन्हान पो.नि काळे ना निवेदनाने मागणी.
कन्हान : – बोलोरो पिकअप वाहनाची सायकल ला धडकेत गंभीर जख्मी अनिकेत दोडके यांचा खाजगी दवाखाना नागपुर येथे उपचार सुरू असुन त्याची मुत्युशी झुंज सुरू असल्याने महाराष्ट्र पोलीस बाईज संघटन पारशिवनी व्दारे कन्हान पोलीस निरिक्षकांना निवेदन देऊन सदर वाहन व आरोपी वाहन चालकास पकडुन कठोर कार्यवाही करून अनिकेत ला न्याय देण्याची मागणी केली आहे.
सोमवार (दि.२) मे २०२२ ला पहाटे सकाळी ५ वा. प्रज्वल ज्ञानेश्वर लुहुरे वय २० वर्ष राह.गहुहिवरा कन्हा न व त्याचा मित्र अनिकेत रामुजी दोडके हे दोघेही सा यकलने अपोलो करीयर अकडमी नगरधन येथे पोली स भरती सरावाकरिता जात असतांना अवैद्य जनावरा ची वाहतुक करणा-या पांढऱ्या रंगाच्या बोलोरो पिक अप वाहनाने अनिकेत दोडके च्या सायकल ला जोरदा र धडक मारल्याने झालेल्या अपघातात अनिकेत दोड के गंभीर जख्मी झाला. त्याचा उपचार न्युराॅन रुग्णाल य नागपुर येथे सुरू आहे. फिर्यादी मित्र प्रज्वल ज्ञाने श्वर लुहरे च्या तक्रारीने कन्हान पोलीसांनी पिकअप वाहन चालका विरुद्ध अप क्र २५५/२०२२ कलम २७९, ३३७, ३३८ भादंंवि सह कलम १८४, १३४ ( अ) ( ब) वाहन कायदा अन्वये गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यां च्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस तपास करित बोलोरो पिकअप वाहन व आरोपी चालका चा शोध घेत असुन कन्हान पोलीसाना अद्याप यश आले नाही.
या अपघातात अनिकेत दोडके च्या डोक्याला गंभीर दु:खापत असल्याने खाजगी न्यूरान दवाखाना नागपूर येथे दाखल करून उपचार सुरू असुन तेथील डॉक्टरानी अंदाजे खर्च ९ ते १० लाख रूपये खर्च सांगितला आहे. अनिकेत च्या घरची परिस्थिती अंत्यत हलाखीची असुन त्याची मृत्युशी झुंज सुरू असल्याने मदतीचे आवाहन करून लोकवर्गणी जमा करणे सुरू आहे. सदर अपघातातील वाहन व आरोपी चालकास त्वरित पकडुन कठोर कार्यवाही करून अनिकेत च्या जिव वाचवुन त्यास व त्याच्या गरीब कुंटुबास न्याय दयावा. अशी मागणी महाराष्ट्र पोलीस बाईज संघटन पारशिवनी तालुकाध्यक्ष निलेश गाढवे यांच्या नेतुत्वात शिष्टमंडळ कन्हान पोस्टे चे पोलीस निरिक्षक विलास काळे हयाना भेटुन निवेदन देऊन केली आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस बाईज संघटना संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले व जिल्हाध्यक्ष लालसिंग यांच्या मार्गदर्श नात शासन, प्रशासन दरबारी अपघात गस्त अनिकेत दोडके ला न्याय मिळवुन देण्याचा पर्यंत करण्यात येणार आहे. शिष्टमंडळात तालुकाध्यक्ष निलेश गाढवे, उपाध्यक्ष मोहन वकलकर, अभिजीत चांदुरकर, शैलेश दिवे, महेश धोंडगे, केतन भिवगडे, श्याम मस्के आदी प्रामुख्याने उपस्थित होते.