सावनेर :- पोलीस स्टेशन सावनेर येथील अप क्र. ८१/२४ कलम ३८०, ४५७, ४२७ भा द.वी. गुन्ह्यामध्ये आरोपीतांनी एका चार चाकी कारने येऊन सावनेर टाऊन परिसरात SBI बँकचे ATM गैस कटरने कापून १०,३०,२००/- रुपयाची चोरी केली आहे. सदर गुन्हयाचे तपासात आरोपी यांनी वापरले कार हिचा CCTV कॅमेरे व टोल नाका याचे करून माहिती घेण्यात आली, आरोपीतांनी वापरलेल्या कारचा वेळोवेळी नंबर बदलवून तपासाची दिशा भूल करण्याचा प्रयत्न केला. टोल नका येथे दिनांक २९.०१.२०२४ चे सर्व CCTV कॅमेरे चेक केले असता आरोपीचे वाहण वापरलेला फास्ट टॅग ID मिळून आला ज्यावरून माहिती घेऊन मोबाईल नंबर प्राप्त करण्यात आला व त्यावर संपर्कात असलेल्या आरोपी बाबत माहिती घेण्यात आली तसेच आरोपीचे कारचे येण्याचा व जाण्याचा मार्ग शोधण्यात आला, सदर गुन्ह्यात आरोपी १. इरफान इम्रान खान २. मुबारक इम्रान खान दोन्ही रा. उटावड ता. हतीन जी. पलवल राज्य हरियाणा ३. वसिम मुसा खान रा. ओहता ता. पुन्हाना जी. नुह राज्य हरियाणा यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन वसीम खान याचे असल्या बाबत माहिती मिळाली आरोपीतांचा शोध घेतला असता आरोपी इरफान खान मिळून आला त्यास गुन्ह्याचे तपास कामी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन सावनेर येथे आणुन पुढील तपास सुरू आहे,
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रा. रमेश धुमाळ, मा सहायक पोलीस अधीक्षक, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर अनिल म्हस्के यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोउपनि, कॉक्रेटवार, राजेंद्र रेवतकर, प्रमोट भोयर, नापोशि किशोर वानखेडे, उमेश फुलवेल, पोस्टे सावनेर येथील ठाणेदार मानकर, सपोनि शरद भस्मे, सफौ गणेश राय, पोहवा अविनाश बहेकर, रवि मेश्राम, पोलीस अंमलदार दाउद मोहम्मद यांनी संयुक्तिकरीत्या पार पाडली.