नागपूर :- पाचपावली पोलीसांचे पथक पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असता त्यांना गुप्त बातमीदारांनी दिलेल्या खात्रीशीर माहितीवरून पाचपावली हद्दीत खैरापुरा शितला माता मंदीर मागे, रेल्वे ट्रॅक जवळ, धाड टाकली असता, त्या ठिकाणी संगणमत करून दरोडा घालण्याचे तयारीत असलेले आरोपी क्र. १) राकेश उर्फ बाबा उर्फ खया नरेश झोडापे वय २९ वर्ष रा. बारसे नगर, आंबेडकर पुतळयाजवळ पाचपावली २) अक्षय भारत टेभुर्णे वय २७ वर्ष रा. भानखेडा, ३) कमलेश शंकर दुपारे वय २६ वर्ष रा. चारसे नगर, पाचपावली ४) हिमाशु विश्वजीत नांदगावे वय २७ वर्ष रा. म्हाडा नारी रोड, कपिलनगर हे समक्ष मिळुन आले व त्यांना साथिदार आरोपी हा अंधाराचा फायदा घेवून पळून गेला, आरोपींचे ताब्यातून एक लोखंडी चायनिज चाकु, एक लोखंडी सत्तूर, दोरी मिर्ची पावडर पॅकेट असा एकुण किमती अंदाजे २,३१०/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी पोलीस ठाणे पाचपावली येथे पोहवा ज्ञानेश्वर भोंगे यांनी दिलेल्या रिपोर्टवरून सपोनि संदे यांनी आरोपीविरूध्द कलम ३९९ ४०२ भा.दं.वी. सहकलम ४/२५ भा.ह.का. सहकलम १३५ म.पो.का अन्वये गुन्हा नोंदवून आरोपी क. १ ते ४ यांना अटक केलेली आहे. पुढील तपास सुरू आहे.