घरफोडी गुन्हयातील आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणची कारवाई

नागपूर :- फिर्यादी नामे गोवर्धन दयारामजी तिजारे, वय ५७ वर्ष, रा. वार्ड क्र. १५. कुही ता. कुही जि. नागपूर याची आई घराचे मागील व पुढील दोन्ही दरवाजे उघडे ठेवुन अंगणात खुर्चीवर बसली असताना अज्ञात इसमाने घरात बुसुन आलमारी उघडुन आलमारीमध्ये ठेवलेले दागिन्यापैकी ३ तोळयाचे मंगळसुत्र, ९८ ग्रॅमची चैन, ०५ ग्रॅमचे कर्णफुल, ०५ ग्रॅमची गरसोली व नगदी २०,०००/- रू. असा एकुण १,६४,०००/- रू. चा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेले. अशा फिर्यादीच्या रीपोर्ट वरून पोस्टे कुही येथे अप. क्र. ४०८/२०२२ कलम ३८० भादंवि, अन्वये गुन्हा नोंद आहे.

सदर गुन्हयाचा समांतर तपासात पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पथकाने दिनांक २२/०८/२०२४ रोजी उमरेड उपविभागातील पोलीस स्टेशन कुही अप. क्र. ४०८/२०२२ कलम ३८० IPC गुन्ह्याचे समांतर तपास व आरोपी शोध करीत असता गोपनीय बातमीदारां कडून माहिती मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी हे कुही ह‌द्दीत संशयितरीत्या फिरत आहे. अशी गोपनीय माहिती व तांत्रिक माहिती वरून कुही ह‌द्दीत सापळा रचुन आरोपी नामे- १) सचिन रामाजी देशमुख वय ३० वर्ष २) लोकेश अशोक किनदरले दोन्ही रा. गाव तलाव जवळ, कुही यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता दोघांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. यातील दोन्ही आरोपीस ताब्यात घेवुन त्यांचेकडुन गुन्हयातील १) सोन्याचे लगड वजन अं. ३८ ग्रा. किंमती ११४,०००/-रू. २) एक जोडी कानातले टांप्स वजन अंदाजे ४.९६० ग्रॅम किमती १५,०००/- रू. ३) सोन्याचे एक दाणी पोत वजन अंदाजे ५ ग्राम किंमती १५,०००/- रू. असा एकूण १,४४,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करून पुढील योग्य कायदेशीर कारवाईस्तव पोलीस स्टेशन कुही यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सपोनी. आशिषसिंह ठाकूर, पोउपनी वडूलाल पांडे, पोहवा इक्बाल शेख, दिनेश आधापुरे, मयूर ढेकले, पोना संजय वरोडिया, सतिष राठोड, पोअं, अमित मेहेरे, चापोनं, आशुतोष लांजेवार यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बदलापूर प्रकरणी विरोधकांच्या दुटप्पी भूमिकेच्या निषेधार्थ भाजपातर्फे आंदोलन

Sat Aug 24 , 2024
मुंबई :-बदलापूर घटनेतील पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच महिला अत्याचार प्रकरणात महाविकास आघाडीच्या नेत्यांची दुटप्पी भूमिका उघड करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभरात ठिकठिकाणी शनिवारी धरणे आंदोलन करण्यात आले. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आ. आशीष शेलार, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ,आ. प्रवीण दरेकर, आ. प्रसाद लाड आदी नेत्यांनी यात सहभाग घेतला. बदलापुरात घडलेल्या दुर्दैवी घटनेतील पीडित […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com