बुट्टीबोरी :-पो.स्टे. एमआयडीसी बोरी अंतर्गत टेवरी चौक येथे दिनांक १२/०२/२०२४ चे ०८.३० वा. दरम्यान आरोपी नामे- मकसूद टायगर मुस्ताख शेख, वय ३० वर्ष, रा. ड्रीम वन कॉलनी, पुरनलाल स्कुल जवळ बुटीबोरी जि. नागपूर याने जुन्या वादावरून संगनमत करून फिर्यादीस शिवीगाळ करून फिर्यादी सोवत वाद विवाद करून नुडल बनविण्याचा डोंगा मोठा चमचा फिर्यादीला जिवे मारण्याच्या इरादयाने डोक्यावर मारला परंतु फिर्यादीने डोक्यावरला डोंगा वाचविला पुन्हा आरोपीतांनी फिर्यादीच्या छातीवर जिव घेण्याच्या इरादयाने तो डोंगा छातीवर व हाताला लागून दुखापत झाली. अशा फिर्यादीच्या रीपोर्ट वरून सदर प्रकरणी फिर्यादी नामे मोहम्मद अकलीम मोहम्मद असलम शेख, वय ३५ वर्षे रा. रूईखैरी बुट्टीबोरी ता. जि. नागपूर यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. एमआयडीसी बोरी येथे आरोपींविरुध्द कलम ३०७, ५०४, ३४ भादंवि. कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. सदरचा गुन्हा दाखल होताच ठाणेदार एमआयडीसी यांनी वेगवेगळे पथक तयार करून आरोपीचा कसोशीने शोध घेतल्याने आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले. पुढील तपास सपोनि भुजबळ हे करीत आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक हर्ष पोहार, अपर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजीव कर्मलवार, भुजबळ व त्यांचे टीमने पार पाडली,