नागपुर / पारशिवनी – स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रामटेक उपविभागात पेट्रोलिंग करीत असतांना गोपनिय बातमीदाराकडुन बातमी मिळाली कि पोलीस स्टेशन पारशिवनी हद्दीतील मौजा दहेगाव जोशी शिवारातुन ट्रॅक्टर ने अवैधरित्या विना परवाना रेती गौणखनिज ची चोरटी वाहतुक होत आहे. अश्या माहीतीकन्हान नदी ते दहेगाव या कच्च्या मातीचा रोड येथे सापळा रचुन अवैधरित्या बिनापरवाना रेती ची वाहतुक करणारे ट्रॅक्टर ताब्यात घेवुन ट्रॅक्टर चालक व मालक आरोपी नामे- दिगांबर कृष्णाजी गभणे वय 50 वर्ष रा दहेगाव ता पारशिवनी यांचे विरूध्द पोलीस स्टेशन पारशिवनी येथे कलम 379 भादवि प्रमाणे गुन्हा नोंदविण्यातआला. तसेच आरोपी यांचेकडुन एक ट्रॅक्टर क्र एम एच 40 एउ 68 कि 5,00,000/- रू व एक ब्रास रेती कि 4000/-असा एकुण 5,04,000/-रू चा माल जप्त केला.
सदरची कारवाई विजयकुमार मगर, पेालीस अधिक्षक नागपुर ग्रामीण तसेच राहुल माकणीकर अपर पोलीस अधिक्षक ना.ग्रा यांचे आदेशाने स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजीव कर्मलवार, सफौ चंद्रशेखर गडेकर, पोलीस हवालदार गजेंद्र चौधरी, पोना अमोल वाघ, रोहन डाखोरे, चापोहवा अमोल कुथे यांचे पथकाने पार पाडली.