नागपूर / अरोली – पोलिस स्टेशन अरोली येथे अवैधरीत्या देशी दारूची विक्री करणाऱ्या आरोपीतांविरूद्ध दोन केसेस करण्यात आले आहे. प्रथम प्रकरणात पोलिस स्टेशन अरोली येथील स्टाफला गुप्त माहिती मिळाली की, अरोली येथे गुजरी चौकात राजकुमार वैद्य नावाचा ईसम दारु विकत आहे. अशा मिळालेल्या माहीती प्रमाने दिनांक 06/06/2022 चे 17/30 वा. ते 18.30 वा. सुमारास अरोली टाउन येथे रेड केली असता आरोपी नामे- राजकुमार निलकंठ वैद्य वय 30 वर्ष रा. अरोली ता. मौदा जिल्हा नागपूर याच्या ताब्यातुन 09 निपा देशी दारु संत्रा 999 लेबल लागलेल्या कि. 720/-रु. चा माल मिळुन आला आहे. सदर गुन्हयात आरोपीविरूद्ध अप क्र. 76/2022 कलम 65 ई मदाका अन्वये नोंद करण्यात आले आहे.
तसेच दुसऱ्या प्रकरणात पोलिस स्टेशन अरोली येथील स्टाफ यांना गुप्त माहिती मिळाली की, अरोली येथे खापरखेडा टोली पुलावर अरोली येथील एक ईसम दारु विकत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहिती प्रमाने दिनांक 07/06/2022 चे 09.45 वा. ते 10.30 वा. सुमारास अरोली पुलावर स्टाफने रेड केली असता आरोपी नामे- कृष्णा उर्फ गुड्डू हरिचंद्र खडसे वय 43 वर्ष रा. अरोली ता. मौदा जिल्हा नागपूर याच्या ताब्यातुन 80 निपा देशी दारु संत्रा 999 लेबल लागलेल्या कि. 6,400/-रू. व एमएच- 36/बी-1398 क्रमांकाची मोटरसायकल किंमत 22,000/-रू. असा एकुण कि. 28,400/-रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयात आरोपी विरूद्ध अप क्रमांक 77/2022 कलम 65 ई म.दा.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही ही नागपुर (ग्रामीण) पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर, अपर पोलिस अधिक्षक राहुल माकणीकर, उपविभागीय पोलिस अधिकारी रामटेक विभाग रामटेक आर एस. चव्हाण यांच्या मार्गदर्षनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जोशी यांच्या नेतृत्वात सहायक फौजदार जाधव, पोलीस नाईक विशाल व पोशि श्रीकांत यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.
बेकायदेशीर देशी दारूची वाहतुक करणाऱ्या आरोपीतांना अटक
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com