नागपूर :- गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभाग पथकाचे अधिकारी व अंमलदार हे गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना पोलीस ठाणे हुडकेश्वर हदीत, प्लॉट नं. १२४, पवनपुत्र नगर, उमरेड रोड, बहादुरा फाटा, नागपूर येथे काही ईसम अॅक्टीव्हा गाडीवर फिरत असुन, एम.डी. पावडर बाळगून आहेत. अशा मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून सापळा रचुन ने रंगाची अॅक्टीव्हा मोपेड क. एम.एच. ३१ एफ.व्ही. ८४२७ या गाडीवरील तिन ईसमांना थांबवून पंचासमक्ष रेड कार्यवाही केली असता, आरोपी १) रोहन सुरेश ढाकुलकर, वय २८ वर्षे २) शुभम सुरेश ढाकुलकर, वय ३१ वर्षे, दोन्हीही रा. पवनपुत्र नगर, उमरेड रोड, नागपुर ३) वेदांत विकास ढाकुलकर, वय २४ वर्षे, रा. वर नं. ६६, नेताजी मार्केट, जानकी टॉकीज मागे, चंतोली, नागपुर यांची व वाहनाची झडती घेतली असता, गाडीचे डिक्कीमध्ये ७१ ग्रॅम ११ मि.ग्रॅम एम.डी. पावडर किंमती ७,११,१००/-रू. ची मिळुन आली. आरोपीचे ताब्यातुन एम.डी. पावडर, चार मोबाईल फोन, एक अॅक्टीव्हा मोपोड, वजन काटा व रोख २२,५००/-रू. असा एकुण ८.४५,१००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी हे त्यांचा साथीदार पाहीजे आरोपी नामे तबरेज आलम उर्फ टिषु वल्द अफरोज आलम, रा. नागपुर याचे मदतीने अवैध अंमली पदार्थ खरेदी, विकी करीत असल्याचे सांगीतले, आरोपींचे कृत्य हे कलम ८ (क), २२ (क) २९ एन.डी.पी.एस. अॅक्ट नुसार होत असल्याने, आरोपीविरुध्द पोलीस ठाणे हुडकेश्वर येथे गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. तिन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपीना मुद्देमालासह पुढील कारवाईस्तव हुडकेश्वर पोलीसांचे ताब्यात देण्यात आले होते, तसेच, पाहीजे आरोपीचा शोध सुरू होता.
दिनांक ०३.१२.२०२४ रोजी गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभाग पथकाचे अधिकारी व अंमलदार हे गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून व सापळा रचुन पाहीजे आरोपी नामे तबरेज अफरोज टिषु अफरोज आलम, वय ३३ वर्षे रा. नाईक रोड, महाल किल्ला जवळ, कोतवाली, नागपुरवास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, त्याने वर नमुद गुन्हा केल्याचे सांगीतले, आरोपीस पुढील कार्यवाहीस्तव हुडकेश्वर पोलीसांचे ताब्यात देण्यात आले.
वरील कामगिरी मा. पोलीस आयुक्त नागपूर शहर, सह पोलीस आयुक्त नागपूर शहर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हेशाखा, सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकाने केली.