नागपूर :- पोलीस ठाणे सदर हद्दीत प्लॉट नं. ११. सुराणा ले-आऊट, राजनगर, नागपूर येथे एकटे राहणारे फिर्यादीचे वडील नामे विनय सॅम्युअल पुणेकर, वय ५२ वर्षे यांना राहते घरी हॉल मध्ये अज्ञात आरोपीने अज्ञात कारणावरून फिर्यादीचे वडीलांचे गळयावर अग्नीशस्त्राने गोळी मारून त्यांना जिवानीशी ठार केले. याप्रकरणी फिर्यादी प्रेज विनय पुणेकर, वय २५ वर्षे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे सदर येथे आरोपीविरूध्द कलम ३०२, ४५२ भादवी, सहकलम ३/२५ भाग.का. सहकलम १३५ म. पो.का अन्वये गुन्हा नोंदविण्यात आलेला होता. तपासादरम्यान सदर पोलीसांनी एक महीला नामें साक्षी मोहीत ग्रोवर, वय ३६ वर्षे, रा. मारबेला अपार्टमेंट, मानकापुर, नागपुर हिला अटक करून तिला विचारपुस केली असता, तिने तिचा परीचीत ईसम हेमंत रामनरेश शुक्ला, रा. मध्यप्रदेश याचे सोबत कट रचुन खुन केल्याचे सांगीतले होते तेव्हापासुन सदर पोलीस आरोपीचा शोध घेत होते. आरोपी हा त्याचे फोन, वेशभुषा तसेच, अस्तित्व लपवुन वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता व नेहमी ठिकाण बदलवित होता. सदर पोलीसांनी अथक परीश्रमाने आरोपीचा शोध घेवून, त्यास लुधीयाना येथुन ताब्यात घेतले.
वरील कामगिरी पोलीस आयुक्त, नागपुर शहर, सह. पोलीस आयुक्त, नागपुर शहर, अपर पोलीस आयुक्त (उत्तर प्रभाग), पोलीस उप आयुक्त (परिमंडळ क. २), सहायक पोलीस आयुक्त (सदर विभाग) यांचे मार्गदर्शनात, यपोनि मनिष ठाकरे, सपोनि किशोरी माने, पोउपनि नारायण घोडके, निलेश घोगरे, अभिजीत चिखलीकर, पोहवा. अमोल दोंदलकर, सतिश गोहत्रे, रविंद्र वैद्य, नापोअं. आशिष बहाळ, मोहन ठाकुर, संजय यादव, उल्हास राऊत, प्रमोद क्षिरसागर, विक्रम ठाकुर, हबीब सय्यद, पंकज तिवारी, सचिन व बालाजी यांनी केली.