कसूरी अहवालानुसार अखेर फौजदार गणेश पाल यांची बदली

– कन्हान पोलीस स्टेशन : प्रकरणात पैसे घेणे भोवले 

 कन्हान :- कन्हान पोलीस स्टेशन येथे कार्यरत ASI गणेश रमेश पाल , ASI सदाशिव काठे व Npc महेंद्र जळतीकर यांना कसूरी अहवालानुसार नागपुर ( ग्रा ) चे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी बदलीचे आदेश दिले असून फ़ौजदार सदाशिव काठे यांची वेलतुर तर महेंद्र जळतीकर यांची जलालखेड़ा पोलीस स्टेशन येथे तत्काल प्रभावाने बदली करण्यात आली होती तर asi गणेश पाल यांची सुद्धा मागील दोन दिवसात बदली करण्यात आली आहे व त्यांची विभागीय चौकशी सुद्धा शुरू करण्यात आली आहे

कन्हान येथे कार्यरत तीन कर्मचाऱ्यांनी एका अपघात प्रकरणात निर्दोष गाड़ी मालकालाकडून पैसे घेतले तर एका पोलिस कर्मचाऱ्यानी त्याच प्रकरणात पुन्हा पैश्याची मागणी करत प्रकरणात दिशाभूल करून गाड़ी मालकाची मानसिक पिळवणुक केली असता याबाबद रिपब्लिकन भीमशक्तिचे चंद्रशेखर भिमटे यांनी सदर गाड़ी मालकाची बाजू मांडता कन्हान पोलीस निरिक्षक सार्थक नेहते कड़े लेखी तक्रार केली होती ज्यात पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक भटकर यांनी केला व प्राथमिक चौकशी अंती कसूरी अहवाला सादर केला ज्यात कर्तव्यदक्ष पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी प्रकरणाची शहनिशा करून त्यांची इतर ठिकाणी बदलीचे आदेश दिले असून कन्हान पोलीस स्टेशन येथे कार्यरत ASI सदाशिव काठे व Npc महेंद्र जळतीकर यांची तत्काल प्रभावाने बदली करण्यात आली तर ASI गणेश रमेश पाल यांची 18 डिसे 23 ला बदली करण्यात आली आहे.

*अपघात प्रकरणात पैसे घेणे आणि दिशाभूल करने भोवले* : कन्हान पोलीस स्टेशन हद्दीततील महामार्ग क्रमांक 44 वर अपघातामध्ये एमपी 20.बीए 7850 चार चाकी गाडीला दुचाकी क्रमांक एमएच 40 आर 6595 ने धडक दिली होती.सदर प्रकरणात पोलीस अधिकारी व कर्मचारी ने दोषी नसतांना चारचाकी गाडीमालक रणमत नंहुलाल मरावी रा.मध्यप्रदेश यांच्या कडून गाडी सोडण्याच्या नावाखाली बळजबरीने, परिचित व्यक्तीच्या खात्यात ऑनलाईन पैशे टाकण्यात बाध्य केले. गाडी चालकाने उदनिर्वाहचे साधन भेटणार या करिता सदर व्यक्तीच्या खात्यात फोनपे द्वारे ऑनलाईन 8000 रुपये बुधवार दिनांक 16/08/2023 रोजी टाकले, मात्र अजून पैशे मिळविण्यासाठी सलग दोन महिने गाडी चालकाला मानसिक व शारीरिक त्रास देण्यात आले. सदर प्रकरणात दोषी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करून नीलंबित करण्याची मागणी रिपब्लिकक भीमशक्ती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर भिमटे यांनी कन्हान पोलीस स्टेशन ठाणेदार सार्थक नेहते यांना निवेदन देऊन केली होती ज्यात प्रकरणाची पारदर्शी चौकशी होणार असल्याचे आश्वासन ठाणेदार सार्थक नेहते यांनी दिले होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अवैध रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीतांविरूद्ध कारवाई

Thu Dec 21 , 2023
– पोलीस स्टेशन रामटेकची कारवाई रामटेक :- पोलीस स्टेशन रामटेक येथील स्टाफ पोलीस स्टेशन रामटेक परीसरात पेट्रोलींग करीत असताना अवैधरित्या विनापरवाना रेतीची वाहतुक होत असल्याची मुखबीरद्वारे मिळालेल्या माहितीवरून एका ट्रकमध्ये विनापरवाना रेतीची वाहतुक होत आहे असे सागितल्यावरून पोलीस स्टेशन रामटेक येथील स्टाफ यांनी रामटेक बसस्थानकाजवळ हायवे रोडजवळ नाकाबंदी केली असता दि. २०/१२/२०२३ ०१.४० वाजता दरम्यान एक ट्रक येतांना दिसला ट्रकला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!