अज्ञात रेल्वेगाडीच्या धडकेने दोन अनोळखी इसमाचा अपघाती मृत्यु

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रमानगर रेल्वे फाटक जवळील चंभार नाला जवळील रेल्वे रुळावर दोन अनोळखी व्यक्तीचा अज्ञात रेल्वे गाडीच्या धडकेने अपघाती मृत्यु झाल्याची घटना गतरात्री साडे आठ दरम्यान उघडकीस आली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालय कामठी येथे हलविण्यात आले.पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून दोन्ही मृतकाची ओळख अजूनही पटलेली नाही. छायाचित्रात नमूद वर्णनाचा इसम ओळखीचे पटल्यास नवीन कामठी पोलीस स्टेशन ला संपर्क साधावे असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

झोपडपट्टी वासियांना येत्या डिसेंबर पर्यंत पट्टेवाटप करा - देवेंद्र फडणवीस

Tue Oct 10 , 2023
– अनधिकृत भुखंडधारकांना नियमितीकरणासाठी विशेष मोहीम – 18 भुखंडधारकांना नियमितीकरण पत्र – 360 झोपडपट्टी धारकांना पट्टेवाटप   नागपूर :- शहरातील झोपडपट्टी वासियांना मालकी हक्काचे पट्टेपाटप येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देवगिरी शासकीय निवासस्थानी अनधिकृत भुखंडाचे नियमितीकरण पत्र व झोपडपट्टी वासियांना पट्टे वाटप करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्र्याच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com